Breaking News

आदरणीय नेतृत्वाकडून आदरातिथ्य; मा.आ. राजेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी दिपावली मिलन

आदरणीय नेतृत्वाकडून आदरातिथ्य; मा.आ. राजेंद्र जगताप यांच्या निवासस्थानी दिपावली मिलन

बीड।एस.एम.न्युज़

माजी आमदार राजेंद्रजी जगताप यांनी त्यांच्या निवासस्थानी आज दिनांक १० नोव्हेंबर २०२६ मंगळवार रोजी दीपावली मिलन कार्यक्रम ठेवला. यात त्यांनी त्यांच्या संपर्कात असलेले सर्व हिंदू-मुस्लिम बांधवांना आवर्जून निमंत्रित केले. आलेल्या प्रत्येकासोबत हस्तांदोलन करून गळा भेट घेत प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन फराळ खाऊ घातला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, जगताप साहेबांचे जुने मित्र मुहम्मद अब्दुल रऊफ़ आणि त्यांचे पुत्र एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनीही कार्यक्रमात उपस्थित राहून जगताप साहेबांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. जगताप साहेबांच्या या कार्यक्रमात येणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती पाहून माजी आमदार जगताप साहेब आजही राजकारणातील आदरणीय व्यक्तिमत्व असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा प्रत्येकास आला.

कोच - लईख़ शेख (लक्की सर)
संपर्क - 920 980 1768
S.K.P. Motor Driving School
Nursery road, Beed.

___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत