Breaking News

पत्रकार देवेंद्रसिंह ढाका यांच्या मुलाचा खून बीडची अति जलद गतीने क्रूरतेकडे वाटचाल!

पत्रकार देवेंद्रसिंह ढाका यांच्या मुलाचा खून

बीडची अति जलद गतीने क्रूरतेकडे वाटचाल!

मटका, गुटका, दारू, पत्ते, वेश्या व्यवसाय आदी दोन नंबरच्या धंद्यांसह आता प्राणघातक हल्लेही चुटकीसरशी होऊ लागले

पोलीस प्रशासनाचा वचकच राहिला नाही?

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत सपशेल अपयशी ठरू लागले!

बीड (एस.एम.न्युज़) - नामांकित पत्रकार देवेंद्रसिंह ढाका यांचा मुलगा यश देवेंद्रसिंह ढाका याचा शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात धारदार चाकूचे वार करून खून करण्यात आला. या घटनेने बीडची अति जलद गतीने क्रूरतेकडे वाटचाल सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अगोदरच शहरासह जिल्हाभरात मटका, गुटका, दारू, पत्ते, मसाज च्या नावाखाली वेश्या व्यवसाय आदी दोन नंबरच्या धंद्यांसह आता प्राणघातक हल्लेही चुटकीसरशी होऊ लागले आहेत. कुणाचा जीव घेणे म्हणजे हाताचे मळ झटकण्यासारखे झाले आहे. जनतेसाठी सदैव कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित असताना पोलीस प्रशासनाचा वचकच राहिला नाहीये. पोलीस प्रशासनाचे जिल्हाप्रमुख म्हणून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे सुद्धा कुचकामी ठरू लागल्याचे दिसून येत असून ते सपशेल अपयशी ठरू लागले आहेत.
बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्यावरून झालेल्या बाचाबाची मध्ये यश देवेंद्रसिंह ढाका वय वर्ष २२ याच्या छातीवर आरपार वार करून खून करण्यात आला. जखमी अवस्थेत तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषित केले. यश ढाका हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी होता. वाढदिवस साजरा करताना झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि पोलीस प्रशासन हे अपयशी ठरत असल्याचे गेल्या काही महिन्यात जिल्हाभरात घडलेल्या विविध गुन्ह्यातील घटनांवरून सातत्याने दिसून येत आहे. अशातच ही खूनाची घटना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अवघ्या काही मीटर अंतरावर असलेल्या माने कॉम्प्लेक्स सारख्या गजबजलेल्या ठिकाणी चाकू भोसकून करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेचा पोलीस प्रशासनासह नवनीत कॉवत यांच्यावरून विश्वास उडू लागला आहे.

आरोपीच्या मुस्क्या आवळल्या

खुनाच्या या क्रूर घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे जोरात फिरवली. ज्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवघ्या अर्ध्या तासात सुरज आप्पासाहेब काटे या आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले. आरोपीस शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक दुबाले, राहुल शिंदे आणि मनोज परजणे यांनी केल्याची माहिती मिळाली आहे.

काही पोलीस कर्मचारी घोरपडी सारखे चिटकून

पोलीस प्रशासनातील विविध विभागात नजर टाकली असता असे दिसून आले की, पोलीस अधीक्षक कार्यालयासह शहरात असलेल्या विविध पोलीस ठाण्यांमधील काही शाखेतील, काही पोलीस कर्मचारी हे वर्षानुवर्षापासून अक्षरशः घोरपडी सारखे चिटकून बसले आहेत. ठराविक मुदतीनंतर अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत? अशा चिटकून बसलेल्या कर्मचाऱ्यांवर कोणाचा वरदहस्त किंवा कुणाची मेहरबानी आहे? आणि कशासाठी? ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे चिटकून ठेवण्यामागे काय गौडबंगाल आहे? अशा चिटकून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे घडलेल्या गुन्ह्यांचा तपास व्यवस्थित होत नाही तसेच गुंड पुंड वृत्तीचे लोक ही अशा घोरपडी सारख्या झालेल्या कर्मचाऱ्यांना भीत नाहीत. कायदा सुव्यवस्था अबाधित राखताना गल्लत होते. तपास कार्य व्यवस्थित होत नाहीत, असेही बोलले जात आहे. अशा चिटकून बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची बदली होऊन खांदेपालट होणे आवश्यक आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत