अजित दादा तुम्ही आमदारांना केला होता वादा खासबाग-मोमीनपुरा पुलासाठी आता धावून आले मुकीत लाला
अजित दादा तुम्ही आमदारांना केला होता वादा
खासबाग-मोमीनपुरा पुलासाठी आता धावून आले मुकीत लाला
बीड (एस.एम.न्युज़) - अतिवृष्टीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आलेले पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेऊन बीड नगर परिषदेचे माजी सभापती युवा नेते मुकीत लाला यांनी बीड शहरवासीयांसाठी कळीचा मुद्दा असलेला खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील नियोजित पूलाचा प्रश्न मांडला आहे. यामुळे यापूर्वी गेल्या पंचवार्षिक विधानसभेत अजित दादा पवार जलसंपदा मंत्री असताना तत्कालीन तथा विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी अनेकदा कागदपत्र घेऊन त्यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्याही सातत्याने भेटीगाठी घेऊन हा पूल निर्माण व्हावा याकरिता पाठपुरावा केला होता. परंतु ती पंचवार्षिक विधानसभा संपून दुसरी सुरू झाली आणि त्यालाही आता जवळपास दुसरे वर्ष सुरू आहे. यावेळी मंत्रिमंडळात अजित पवार हे फक्त बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीच नव्हे तर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा आहेत. तरीही खासबाग-मोमीनपुरा जोडणाऱ्या बिंदुसरा नदीवरील पुलाचे काम काही अजूनही सुरू झालेले नाही. यंदा तर सगळीकडे सातत्याने धुवाधार पाऊस पडत असल्याने बिंदुसरा नदीला सातत्याने दुथडी भरून पूर येत आहेत. दुथडी भरून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीतून मोठ्या गतीने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने खासबाग-मोमीनपुरा येथे राहणाऱ्यांना तसेच कुरेशी मुहल्ला, ढगे कॉलनी, मोमीनपुरा, बीड मामला, मुहम्मदीया कॉलनी परिसरातील अनेक वसाहती आणि नगरे आदी भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना जवळचा असणारा हा मार्ग बंद झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली असून नागरिकांना या जवळच्या मार्गाने ये-जा करणे सोपे होते. यामुळे एक तर लोकांचा वेळ वाचतो तसेच वाहन धारकांचे इंधन वाचते. ऑटो रिक्षाने जाणाऱ्यांना भाडेही कमी लागते मात्र नदीतून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यावर हा मार्ग बंद होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या सर्व बाबी पाहता माजी सभापती मुकीत लाला यांनी अजित दादा पवार यांना हा पूल निर्माण करावा याकरिता निवेदन दिले. यामुळे अजित दादा तुम्ही बीड च्या आमदारांना केला होता वादा. खासबाग-मोमीनपूरा पुलासाठी आता धावून आले मुकीत लाला असे जनतेतून बोलले जात आहे.
मुकीत लाला यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीतून सरकारी दवाखाना, कब्रस्तान स्मशानभूमी, शाळा महाविद्यालय, आडत मार्केट, भाजी मार्केट, व्यापार पेठ, बाजारपेठ, मंदिर-मस्जीद येथे सुरळीतपणे ये-जा करण्यासाठी शहरातील दोन मोठ्या वस्त्यांना जोडणाऱ्या एक पुलाची आवश्यकता आहे. या भागामध्ये अनेक धार्मिकी स्थळ आहे. अनेक वर्षांपासून पूलाची मागणी होत आहे. याची अत्यंत गरज आहे. यामुळे मेहेरबान साहेबांनी खासबाग-मोमीनपुरा जोडणारा बिंदुसरा नदीवरील नियोजित पूल लवकरात लवकर निर्माण करून द्यावा अशी मागणी माजी सभापती मुकीत लाला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.
*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा