Breaking News

ट्विंक्लिंग स्टार शाळेकडे जाणारा पूल झाला धोकादायक; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

ट्विंक्लिंग स्टार शाळेकडे जाणारा पूल झाला धोकादायक; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

तात्काळ नवीन उंच पूल बांधावा - एस.एम.युसूफ़

बीड (एस.एम.न्युज़) - शहरापासून लांब असलेल्या ट्विंक्लिंग स्टार शाळेकडे जाणारा पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या पुलाची अवस्था पाहता येथे तात्काळ नवीन उंच पूल बांधण्याची गरज आहे. यामुळे संबंधित शासकीय-प्रशासकीय यंत्रणेने येथे लवकरात लवकर नवीन पुलाचे निर्माण करावे अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, बीड शहरापासून लांब असलेल्या उत्तम नगर परिसरा पुढे कर्परा नदीच्या पलीकडे ट्विंक्लिंग स्टार स्कूल या शाळेकडे जाणारा कर्परा नदीवरील पूल अत्यंत धोकादायक स्थितीत आला आहे. पुलावरील रस्त्याचा काही भाग पाण्यात वाहून गेला असून मुख्य पुलाचा रस्ता जागोजागी खचला आहे. मोठमोठ्या भेगा पडल्यामुळे तसेच सध्या जोरदार पाऊस पडत असल्याने कर्परा नदीला आतापर्यंत अनेकदा पूर आलेले आहेत. पुलावरून सातत्याने पुराचे पाणी वाहत असल्याने हा पूल कधीही कोसळू शकतो. ट्विंक्लिंग स्टार शाळेकडे जाणारा हा एकमेव मार्ग असल्याने विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शाळेच्या मोठ्या जड गाड्या याच पुलावरून ये-जा करतात. जर कधी पुलावरून शाळेची गाडी जात असताना हा पूल कोसळला तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या जीवितास मोठ्या प्रमाणात धोका आहे. ही बाब लक्षात घेता हा पूल ज्यांच्या अखत्यारीत आहे मग ते जिल्हा प्रशासन, बीड नगर परिषद किंवा ग्रामपंचायत कोणीही असो संबंधित शासकीय-प्रशासकीय यंत्रणेने तांत्रिक बाबी जलद गतीने हाताळून ट्विक्लिंग स्टार शाळेकडे जाणाऱ्या या पुलाच्या जागी नवीन उंच पुलाचे निर्माण करावे अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्तपत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केली आहे.
===========================
*एस.एम.न्युज़ च्या सेवा*
१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.
२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.
३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.
४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार)
आसेफ़नगर, बीड.
संपर्क - *9021 02 3121*
*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*
दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत
शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत
*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत