Breaking News

अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीत ईद मिलाप कार्यक्रम


अजित पवार यांच्या विशेष उपस्थितीत ईद मिलाप कार्यक्रम

मोठ्या संख्येने उपस्थित रहा - सय्यद फारूक अली पटेल

बीड (एस.एम.न्युज़) - नगर परिषद चे माजी उपनगराध्यक्ष, गटनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक सय्यद फारूक अली पटेल यांनी रमज़ान ईद निमित्ताने उद्या दिनांक ०२ एप्रिल २०२५ रोजी ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

रमज़ान ईद निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सर्वधर्मीय बांधवांसाठी दिनांक ०२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजेपासून ईद मिलाप कार्यक्रमाचे आयोजन सय्यद फारुक अली पटेल मित्र परिवार बीडकडून करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही हा कार्यक्रम फारुख पटेल याच्या निवासस्थानासमोर, मुहम्मद अली रोड, शहिंशाह नगर, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. यांना कार्यक्रमात मुस्लिम बांधवांसह सर्वधर्मीय बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

*उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राहणार विशेष उपस्थिती*

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची सुद्धा या कार्यक्रमात विशेष उपस्थिती राहणार आहे.

*या मान्यवरांचीही राहणार प्रमुख उपस्थिती*

धनंजय मुंडे (मा. मंत्री तथा आमदार परळी वै.), अमरसिंह पंडित (सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महा.राज्य), आमदार विजयसिंह पंडित, सलिम सारंग (राष्ट्रीय अध्यक्ष मुस्लिम वेल्फेअर), कल्याण आखाड़े (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष ओ.बी.सी. सेल), डॉ. योगेश क्षीरसागर (बीड विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), राजेश्वर चव्हाण (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), अमर नाईकवाडे ( माजी नगरसेवक, बीड), मोईनुद्दीन मास्टर (माजी उपनगराध्यक्ष, बीड), अविनाश नाईकवाडे (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), शेख तय्यब भाई (मौलाना आजाद महामंडळ संचालक), बळीराम गवते (पंचायत समिति सभापती), अश्फाक इनामदार (माजी नगरसेवक), शेख इकबाल (जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), शेख अलीम पटेल (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, असंघटीत कामगार विभाग).

===========================

*एस.एम.न्युज़ च्या सेवा*

१) *कार्यालयीन निवेदन व बातमी* योग्य दरात लिहून मिळेल.

२) विविध वृत्तपत्रात देण्यासाठी *जाहिरात, जाहीर प्रगटन, नावात बदल* च्या जाहिराती स्वीकारल्या जातील.

३) एस.एम.न्युज़ वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलसाठी *जाहिराती* स्वीकारल्या जातील.

४) *लेखकांनी* लिहिलेल्या *पुस्तकांचे* प्रकाशन पूर्व *करेक्शन* करून दिले जाईल.

*एस.एम.युसूफ़* (मुक्तपत्रकार) 

आसेफ़नगर, बीड.

संपर्क - *9021 02 3121*

*लिखाण काम स्विकारण्याचे वेळापत्रक*

दर शुक्रवारी - सकाळी १०:०० ते रात्री १०:०० पर्यंत

शनिवार ते गुरुवार - सकाळी ०८:०० ते १०:०० व रात्री १०:०० ते ११:०० पर्यंत

*कृपया बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत