Breaking News

मिल्लिया प्राथमिक शाळा धारूर येथे विद्यार्थ्यांना गृहपाठ साहित्य संच मोफत वाटप! दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अब्दुल वाहेद चिश्ती, तजम्मूल शेख यास्मिन कादरी या शिक्षकांचा संयुक्त उपक्रम

मिल्लिया प्राथमिक शाळा धारूर येथे विद्यार्थ्यांना गृहपाठ साहित्य संच मोफत वाटप!दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अब्दुल वाहेद चिश्ती, तजम्मूल शेख यास्मिन कादरी या शिक्षकांचा संयुक्त उपक्रम

धारूर।एस.एम.न्युज़

येथील मिल्लिया प्राथमिक शाळा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अब्दुल वाहेद चिश्ती, तजम्मूल शेख, यास्मिन कादरी या शिक्षकांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना गृहपाठ साहित्य संच मोफत वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले.
                   मिल्लिया शाळेतील उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून सुपरिचित असलेले अब्दुल वाहेद चिश्ती, तजम्मूल शेख, यास्मिन कादरी या शिक्षक-शिक्षिकेने इयत्ता दुसरीच्या अ, ब, क या तुकड्यांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना गृहपाठ संच मोफत देण्याचा स्तुत्य संयुक्त उपक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राबविला. तिन्ही शिक्षकांच्या या उपक्रमामुळे इयत्ता दुसरीच्या तिन्ही तुकड्यामधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर आनंदाचे स्मितहास्य उमटले. यापूर्वीही हे तिन्ही शिक्षक विद्यार्थ्यांना गृहपाठ संच सप्रेम भेट देत होते. यावर्षी मात्र शालेय साहित्य हे एका विशेष दर्जाच्या पाकिटात एकत्र करून देण्यात आले. या संचात गृहपाठासाठी लागणारे आवश्यक शैक्षणिक साहित्य होते. गृहपाठासाठीचा संच देऊनच हे तिन्ही शिक्षक थांबले नसून जे विद्यार्थी, विद्यार्थिनी गृहपाठात चांगले व उत्कृष्ट कार्य करतील त्यांना या तिन्ही शिक्षकांकडून विशेष असे बक्षीस सुद्धा देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

*कोच - लईख़ शेख (लक्की सर)*
संपर्क - *920 980 1768*
*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत