प्रामाणिकपणा, जिद्द आणि कर्तृत्वाचा भव्य आविष्कार….!
प्रामाणिकपणा, जिद्द आणि कर्तृत्वाचा भव्य आविष्कार….!
बीडच्या वैभवात मानाचा तुरा रोवणाऱ्या ‘व्ही.आय.पी. पॅलेस’चा दिमाखदार शुभारंभ
काही माणसे केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी धडपडत नाहीत, तर आपल्या कष्टातून, प्रामाणिक पणातून आणि कर्तृत्वातून संपूर्ण समाजासमोर यशाचा एक आदर्श निर्माण करतात. हाजी सय्यद नजीर साहेब हे अशाच कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वा पैकी एक आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रामाणिकपणाची कास धरून त्यांनी बांधकाम उद्योग विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या यशाकडे पाहताना केवळ एका उद्योजकाची प्रगती दिसत नाही, तर अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांची, संघर्षाची आणि दूरदृष्टीची यशोगाथा डोळ्यांसमोर उभी राहते.
हाजी सय्यद नजीर साहेब यांनी आपल्या सर्व भावंडांना सोबत घेऊन ‘जी. एन. कन्स्ट्रक्शन’ या छोट्याशा रोपट्याची लागवड केली. मात्र, प्रामाणिकपणा, दर्जेदार काम, वेळेची तत्परता आणि ग्राहकांच्या विश्वासाचे खतपाणी घालत त्यांनी या रोपट्याचे एका विशाल वटवृक्षात रूपांतर केले. आज हजारो वास्तूंच्या उभारनीतून जी. एन. कन्स्ट्रक्शनने बांधकाम क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
बीड शहरात उभ्या राहत असलेल्या विविध शासकीय इमारती आणि बांधकामांच्या माध्यमातून जी. एन. कन्स्ट्रक्शनच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता आणि अनुभवाची प्रचिती येते. बांधकाम व्यवसायात केवळ इमारती उभारणे महत्त्वाचे नसते, तर त्या वास्तूंच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करणे अधिक महत्त्वाचे असते. हाजी नजीर साहेब यांनी आपल्या कामातून हे विश्वासाचे नाते जपले आहे.
विशेष कौतुकाची बाब म्हणजे हैदराबादसारख्या महानगरांमध्ये पाहायला मिळणाऱ्या भव्यदिव्य आणि आधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज फंक्शन हॉलच्या धर्तीवर त्यांनी बीड शहरात एक नव्हे, तर दोन भव्य फंक्शन हॉल उभारून दाखवले आहेत. ही केवळ व्यावसायिक गुंतवणूक नाही, तर आपल्या शहराला आधुनिक सुविधांनी समृद्ध करण्याची त्यांची दूरदृष्टी आणि विकासाची सकारात्मक भावना आहे.
याच यशस्वी वाटचालीतील आणखी एक दिमाखदार आणि अभिमानास्पद पाऊल म्हणजे ‘व्ही.आय.पी. पॅलेस’!
आलिशान मॅरेज हॉल, सुंदर डायनिंग हॉल, महिलांसाठी स्वतंत्र वेटिंग आणि डायनिंग हॉल तसेच आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेला हा भव्य परिसर बीड शहराच्या वैभवात निश्चितच भर घालणारा ठरणार आहे. विवाह सोहळे आणि विविध मंगलमय कार्यक्रमांसाठी शहरवासीयांना दर्जेदार, प्रशस्त आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास पात्र आहे.
हाजी सय्यद नजीर साहेब यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा मनमिळावू स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती आणि प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची हातोटी. माणसे जोडणे, नाती जपणे आणि आपल्या कामातून विश्वास निर्माण करणे ही त्यांची खरी ताकद आहे. म्हणूनच ते केवळ यशस्वी उद्योजक म्हणून नव्हे, तर एक आपुलकीचे आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात.
खरे तर यश म्हणजे केवळ पैसा, संपत्ती किंवा मोठमोठ्या इमारती उभारणे नव्हे; तर आपल्या कष्टातून निर्माण केलेल्या प्रत्येक वास्तूच्या माध्यमातून समाजाच्या गरजा पूर्ण करणे आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणे होय. हाजी सय्यद नजीर साहेब यांचा आजवरचा प्रवास याच विचारांची साक्ष देणारा आहे.
आज बीडच्या मातीतून उभे राहिलेले जी. एन. कन्स्ट्रक्शनचे हे यश म्हणजे मेहनतीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. हाजी सय्यद नजीर साहेब यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत त्यांच्या श्रमसाफल्याचे अभिनंदन आणि
कर्तृत्वाला सलाम, नव्या पर्वाला शुभेच्छा!
हाजी सय्यद नजीर साहेब, आपण आपल्या कष्टाने, जिद्दीने आणि प्रामाणिकपणाने यशाचे जे शिखर गाठले आहे, त्याचा आम्हाला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. आपल्या या यशस्वी वाटचालीला मनःपूर्वक सलाम!
‘व्ही.आय.पी. पॅलेस’च्या भव्य शुभारंभा निमित्त आपल्यासह आपल्या संपूर्ण परिवाराचे आणि जी. एन. कन्स्ट्रक्शन च्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
अल्लाह त्आला आपल्या व्यवसायात उत्तरोत्तर बरकत, भरभराट आणि यश अता फरमावो. आपल्या हातून समाजाची अशीच उत्तम सेवा घडत राहो आणि आपल्या कर्तृत्वाचा सुगंध दूरवर दरवळत राहो. हीच मनःपूर्वक दुआ!
कारण काही माणसे स्वतःचे नशीब घडवतात, तर काही माणसे आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण शहराचे वैभव घडवतात!
व्ही.आय.पी. पॅलेसच्या नव्या पर्वासाठी लाख-लाख शुभेच्छा!
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा