Breaking News

६९ वर्षीय व्ही.अनबू चार्लस यांचे प्रदूषण मुक्त भारत जनजागृतीसाठी सायकल वरून भारत भ्रमण; महात्मा गांधी यांची जयंती साजरी

६९ वर्षीय व्ही.अनबू चार्लस यांचे प्रदूषण मुक्त भारत जनजागृतीसाठी सायकल वरून भारत भ्रमणबीडमध्ये आले असता महात्मा गांधी जयंती दिनी सामाजिक कार्यकर्त्यांकडून सन्मानशालेय विद्यार्थ्यांनाही कौतुक आणि उपस्थितीसामाजिक कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केली जयंती साजरी"बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो" गांधीजींचा हा संदेश देणाऱ्या माकडांच्या प्रतिकृतीस ही पुष्पहार अर्पण केले

बीड (प्रतिनिधी ) - व्ही.अनबू चार्लस, वय ६९ वर्ष, राहणार वलयपट्टी, जिल्हा नमकल्ली,  तामिळनाडू राज्य येथील रहिवासी असून ते सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सायकल चालविल्याने कार्बन फूटप्रिंट आणि ध्वनी प्रदूषण कमी होते. सायकल वापरल्याने दरवर्षी अंदाजे ६ ते १४ दशलक्ष कार्बनडाय-ऑक्साइड ची बचत होऊ शकते, सायकल वापरा रोगमुक्त व्हा, प्रदूषण मुक्त भारत संदेश देत सायकल वरून जनजागृती करत अनबू चार्लस तामिळनाडू येथून जम्मू-काश्मीरच्या दिशेने जात असताना बीड शहरामध्ये २ ऑक्टोबर २०२६ शुक्रवार रोजी सकाळी दहाच्या दरम्यान आले असता सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा छत्रपती संभाजी महाराज मैदानावर महात्मा गांधी जयंती निमित्त महात्मा गांधी अर्धाकृती पुतळ्यास त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच माने कॉम्प्लेक्स समोरील महात्मा गांधी यांच्या विचारांच्या प्रतिकृती असलेल्या तीन माकडांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर अनबू चार्लस यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आर्थिक मदत करून पुढील प्रवासास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. संजय तांदळे, प्राचार्य डी.जी.तांदळे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, ॲड.सुरेंद्र देशमुख, राजकुमार कदम, नितीन जायभाये, बाळासाहेब मोरे पाटील, आत्माराम वाव्हळ, मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़, रामधन जमाले, गणेश बजगुडे, सखाराम बेगडे, हनुमान घोडके, पांडुरंग हराळे, राजेंद्र आमटे, प्रवीण आनेराव, आज़ाद पत्रकार ईमरोज शरीफ़, लक्ष्मण चाटे, बाजीराव ढाकणे, वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधवर आदींची उपस्थिती होती.

*व्ही. अनबू चार्लस सायकल वरून येणार म्हणून -*

व्ही. अनबू चार्लस तामिळनाडूहून सायकलवर निघून जम्मू काश्मीर पर्यंत जात असल्याचे आणि ते बीड शहरात पोहोचल्याचे समजल्यानंतर इयत्ता सातवीत शिकणारा नुबैद शेख आणि इयत्ता चौथीत असलेला यमन शेख हे दोन्ही विद्यार्थी मैदानात आले आणि त्यांची भेट घेतली. सायकलवरून प्रदूषण मुक्त देश व्हावा हा संदेश देण्यासाठी भारतभ्रमणावर निघालेल्या व्ही. अनबू चार्लस यांच्या विषयी असलेले कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा दिसून आले.

व्ही.अनबू चार्लस म्हणाले -

यावेळी उपस्थित राहत दोन विद्यार्थ्यांनी दाखवलेली जिज्ञासा पाहून व्ही. अनबू चार्लस म्हणाले, विद्यार्थी भारताचे भविष्य आहेत. त्यांच्यावर विद्यार्थी दशेपासूनच प्रदूषण, ध्वनी प्रदूषण मुक्त भारत विषयी संस्कार घडले तर पुढे चालून आपला भारत देश प्रदूषण मुक्त होऊ शकतो.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत