Breaking News

महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार संघाच्या वतीने बीड शहर बचाव मंचचे नितीनभाऊ जायभाये यांचा सस्नेह सत्कार

महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार संघाच्या वतीने बीड शहर बचाव मंचचे नितीनभाऊ जायभाये यांचा सस्नेह सत्कार

बीड।एस.एम.न्युज़ - शहरातील हॉटेल अन्विता, हॉल येथे महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार संघटनेची महत्त्वाची बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा बीड शहर बचाव मंचाचे अध्यक्ष नितीनजी जायभाये हे पत्रकार संघटनेच्या वतीने सस्नेह निमंत्रित होते. यावेळी जिल्हाभरातून संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार तथा संपादक, सर्व सदस्य मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी नितीन जायभाये यांचा सामाजिक व राजकीय कार्याबद्दल  महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार संघ, मुंबई तथा बीड जिल्हा, मराठवाडा विभागाच्या वतीने  सन्मानपूर्वक उल्लेखनीय सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रमुख समीर देसाई, पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग प्रमुख अनिल जायभाये, ज्येष्ठ पत्रकार संपादक व मराठवाड्याचे प्रमुख तथा बीड जिल्ह्याचेही मार्गदर्शक वैभव स्वामी, सचिव सागर माने, महिला मराठवाडा विभाग प्रमुख आयेशा शेख, महिला संघटक अश्विनी वायसे तथा स्नेहल शेडगे आदी सर्व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये  महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक बालाजी जगतकर यांची जिल्हाध्यक्षपदी  तर महिला जिल्हाध्यक्षपदी आरती परळकर यांची सर्वानुमते बहुमताने निवड करण्यात आली.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*

शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे. म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत