भीषण अपघातात दोन तरुण, दोन गायी आणि तीन बैलांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी
भीषण अपघातात दोन तरुण, दोन गायी आणि तीन बैलांचा दुर्दैवी मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी
अंबाजोगाई।एस.एम.न्युज़
बीड जिल्ह्यातील नेकनूरजवळ परिसरात रविवारी, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी वेळ संध्याकाळी ०४:०० वाजता टिप्पर आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना समोर घडली आहे. या अपघातात अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली येथील शौकत भाई कुरेशी यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कुरेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नेकनूरजवळ टिप्पर आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात दोन गायी आणि तीन बैलांचाही मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, अपघातात दोन तरुण, दोन गाई आणि तीन बैलांचा मृत्यू झाला आहे. पिकअप वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन जण गंभीर जखमी झाले आहे.
अपघाताच्या कारणांचा तपास होणे आवश्यक
हा भीषण अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनांचा वेग किती होता आणि अपघातास जबाबदार कोण आहे, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. संबंधित यंत्रणांनी अपघाताची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणणे आवश्यक आहे.
परिसरात हळहळ, कुरेशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर
शौकत भाई कुरेशी यांच्या दोन मुलांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर अंबाजोगाई शहरात शोककळा पसरली आहे. या कठीण प्रसंगी दुःख व्यक्त करण्यासाठी नागरिकांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा