पीर ओ मुर्शिद हज़रत सय्यद नुसरत तनवीर मियाँ क़िबला यांची पवित्र उमराह यात्रा पावसासाठी मक्का-मदिनेत प्रार्थना करण्याची शेख कुटुंबीयांनी केली विनंती
पीर ओ मुर्शिद हज़रत सय्यद नुसरत तनवीर मियाँ क़िबला यांची पवित्र उमराह यात्रा
पावसासाठी मक्का-मदिनेत प्रार्थना करण्याची शेख कुटुंबीयांनी केली विनंती
बीड।एस.एम.न्युज़
पीर ओ मुर्शिद हज़रत सय्यद नुसरत तनवीर मियाँ क़िबला पवित्र उमराह यात्रेला रवाना होणार आहेत. मक्का-मदिनेला रवाना होण्यापूर्वी त्यांनी हैद्राबादहून बीड ला येवून आपले अनुयायी असलेल्या शेख कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पावसासाठी मक्का-मदिनेत प्रार्थना करण्याची शेख कुटुंबीयांनी विनंती केली.
महेदवीया समाजाचे मुर्शिद हे येत्या १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पवित्र उमराह यात्रेकरिता मक्का-मदीनेस हैदराबादहून रवाना होणार आहेत. या अनुषंगाने त्यांनी हैदराबादहून प्रथम औरंगाबाद येथे आपले अनुयायी शेख सुलतान याकूब यांच्या निवासस्थानी भेट दिली. तिथे सुलतान यांच्यासह वासेख़ शेख यांनी त्यांचे आदरातिथ्य करून मक्का-मदीना येथे अल्लाह च्या घरी, मुहम्मद पैगंबर यांच्या दरबारात आमच्यासह सर्व समाजासाठी, पावसासाठी दुवा करावी अशी विनंती केली.
औरंगाबादहुन मुर्शिद बीड येथे एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्या निवासस्थानी आले. इथे त्यांनी शेख कुटुंबीयांच्या तीन पिढीची भेट घेतली. सर्वांना आशीर्वाद दिले. यावेळी शेख कुटुंबियातील एम.ए.रऊफ़, एस.एम.युसूफ़, वसीफ़ शेख, लईख़ शेख, नुबैद शेख, यमन शेख यांच्यासह सर्व कुटुंबीयांची उपस्थिती होती. सर्वांनी मुर्शिद यांच्याकडे मक्का-मदिनेत आमच्यासह सर्व समाजासह पावसासाठीही अल्लाहकडे दुवा करावी अशी विनंती केली.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा