गॅलक्सी पॉलिक्लिनिक'च्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. सय्यद सोहेल यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
'गॅलक्सी पॉलिक्लिनिक'च्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
डॉ. सय्यद सोहेल यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
बीड।एस.एम.न्युज़ - सर्वसामान्यांचे आरोग्य निरोगी राहावे आणि वेळेवर योग्य उपचार मिळावेत या सामाजिक उद्देशातून बालेपीर भागातील नगर रोडवर 'गॅलक्सी पॉलिक्लिनिक' (पोलीस पेट्रोल पंपासमोर, एफ.एम. जिम खाली) येथे दिनांक ११ ऑक्टोबर रविवार रोजी आयोजित मोफत सामान्य आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिराला रुग्णांचा व नागरिकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये डॉ. सय्यद सोहेल एम.डी. फिजीशियन यांनी उपस्थित शेकडो रुग्णांची आस्थेने व सखोल तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन केले.
या शिबीरादरम्यान रुग्णांची सामान्य आरोग्य तपासणी, उच्च रक्तदाब आणि रँडम ब्लड शुगर चाचणी करण्यात आली. याशिवाय आवश्यकतेनुसार रुग्णांची ई.सी.जी. चाचणी, लिपिड प्रोफाईल टेस्ट (रक्तातील चरबीचे प्रमाण) व किडनी/लिव्हरची तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली.
तसेच सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, अशक्तपणा यावरील टॉनिक व इतर सर्व आवश्यक औषधींचे रुग्णांना मोफत वाटप करण्यात आले.
सकाळपासूनच शिबीरात रुग्णांनी गर्दी केली होती. अत्यंत निसर्गोपचार व आधुनिक वैद्यकीय उपचारांचा मेळ घालत डॉ. सय्यद सोहेल यांनी प्रत्येक रुग्णाची आपुलकीने चौकशी करून मार्गदर्शन केले. "तुमचे आरोग्य आमची पहिली प्राथमिकता" हे ब्रीद समोर ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरामुळे परिसरातील शेकडो सर्वसामान्य व गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. नागरिकांनी डॉ. सय्यद सोहेल आणि गॅलक्सी पॉलिक्लिनिकच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा