सल्लागार व प्रसिद्धी प्रमुख पदी शेषराव मोहनाजी सोपणे, रामेश्वर शिवाजी सुरनर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड
सल्लागार व प्रसिद्धी प्रमुख पदी शेषराव मोहनाजी सोपणे
रामेश्वर शिवाजी सुरनर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवडपालम।एस.एम.न्युज़
पालम तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण/व्हि.बी.जी.रामजी कायद्या अंतर्गत, ग्रामीण भागातील विकासात्मक, वैयक्तिक व सार्वजनिक कामे पारदर्शक व्हावे, म्हणून प्रत्येक ग्रामपंचायती मध्ये, शासनाने ग्राम रोजगार सहाय्यक पदाच्या, २००५ साली नेमणुका केल्या, परंतु २० वर्षे होऊन ही, महाराष्ट्र राज्यातील, रोजगार सहाय्यकासाठी कोणतेही ठोस निर्णय घेतले जात नसल्याने, महाराष्ट्र ग्राम रोजगार सहाय्यक संघटना स्थापन करून, केलेल्या कामाची कुठेतरी, शासनाने नोंद घ्यावी व ग्राम रोजगार सहाय्यकच्या पोटा पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या उद्देशाने राज्य, प्रांत जिल्हा, तालुका व ग्राम पातळीवर, निवडलेल्या रोजगार सहाय्यक कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून, नवनिर्वाचित कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
या अनुषंगाने सल्लागार व प्रसिद्धी प्रमुख पदी शेषराव मोहनाजी सोपणे तर, रामेश्वर शिवाजी सुरनर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर संघटनेच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी व नियुक्त्या खालील प्रमाणे करण्यात आल्या.
ग्रामपंचायत पेंडू येथील ग्रामरोजगार सहाय्यक, गोपाळ नरहरी पातळे, उपाध्यक्ष, ग्राम पंचायत खडी रोजगार सहाय्यक वैभव रामराव बिलापट्टे, सचिव ग्रामपंचायत बनवस रोजगार सहाय्यक, शिवाजी शेषराव पुणे कोषाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली.
संघटनेच्या सर्कलनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या असून, पेठ शिवणी सर्कल प्रमुखपदी ज्ञानेश्वर गोविंदराव शिंदे, चाटोरी सर्कल प्रमुखपदी दिगंबर बाबाराव पैक, रावराजूर सर्कल प्रमुखपदी विठ्ठल गंगाधर पाळे व बनवास सर्कल प्रमुखपदी ज्ञानेश्वर रामदास शिंदे यांची निवड करण्यात आली. सर्वानुमते सल्लागार व प्रसिद्धीप्रमुखपदाची जबाबदारी शेषराव मोहनाजी सोपणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या निवडीबद्दल तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा