Breaking News

श्री. नारायण हायस्कूलचे गणिताचार्य शेख अशफाक अहेमद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर कादरी फाउंडेशन कडून राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने होणार सन्मान

श्री. नारायण हायस्कूलचे गणिताचार्य शेख अशफाक अहेमद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कादरी फाउंडेशन कडून राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने होणार सन्मान

बीड।एस.एम.न्युज़ - शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट, उल्लेखनीय आणि अविरत योगदानाची दखल घेत नारायण हायस्कूल, आहेरचिंचोली (ता. जि. बीड) येथील सहशिक्षक तथा गणिताचार्य अशफाक अहेमद क़य्यूम शेख यांना या वर्षीचा 'कादरी फाउंडेशन राज्यस्तरीय गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' घोषित करण्यात आला आहे. अशी माहिती कादरी फाउंडेशनचे अध्यक्ष  ज़ैद कादरी आणि निवड समितीचे हकीम मनियार, दैनिक सत्यवादी चे मुख्य संपादक रेहान शेख, सायं. दैनिक बीड प्रसार चे संपादक समीर काज़ी, साप्ताहिक लोकनाथ चे संपादक अब्दुल रहेमान, संपादक, निवड समिती सदस्य ज़फ़र खान, मोहसीन बेग, अन्वर मसरूर, मुशीर इनामदार, वसीम शेख यांनी पत्रकाद्वारे दिली. 

                      यावेळी कादरी फाउंडेशन कडून आदर्श समाजरत्न पुरस्कारासाठी निवडले गेलेले पाटोद्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक सलीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
                  अशफाक अहेमद शेख यांनी गेल्या २२ वर्षांपासून गणित या क्लिष्ट मानल्या जाणाऱ्या विषयाचे अध्यापन अत्यंत सोप्या, रंजक आणि रसाळ पद्धतीने हाताळून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एम.एम.एस. (NMMS), स्कॉलरशिप परीक्षा आणि गणित संबोधी परीक्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. आज त्यांचे अनेक विद्यार्थी अभियंता, (Engineer), डॉक्टर तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणारे कुस्तीपटू म्हणून नावारूपास आले आहेत. यापूर्वीही त्यांना साप्ताहिक 'द स्कूल एक्सप्रेस चा आदर्श शिक्षक पुरस्कार' आणि 'डॉ. ज़ाकीर हुसेन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

२७ सप्टेंबर रोजी पुरस्कार वितरण सोहळा

अशफ़ाक शेख यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि मार्गदर्शक कार्याचा सन्मान करण्यासाठी रविवार, २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता हॉटेल गोल्डन चॉईस, बार्शी रोड, बीड येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत