दैनिक प्रवक्ता लोकशाहीच्या कार्यालयात महामानव अभिवादन ग्रुप तर्फे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा
बीड।एस.एम.न्युज़ - 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तरीपण काही संस्थाने भारतात विलीन झाली नव्हती. त्या तीन संस्थानापैकी एक मोठे संस्थान म्हणजे हैदराबाद राजधानी आसलेले निजामाचे संस्थान होय. हे हुकूमशाही संस्थान पोलीस ॲक्शन मुळे 17 सप्टेंबरला भारतात विलीन झाले. व त्या जुलमी रजाकाराच्या अत्याचारातून मराठवाडा देखील मुक्त झाला. या संघर्षमय काळात अनेक ज्ञात अज्ञात शूरवीरांनी शहिदांचे वीरमरण स्वीकारले.त्या शहिदांना महामानव अभिवादन ग्रुप बीड व वाचाल तर वाचाल फिरते मोफत वाचनालया तर्फे प्रवक्ता लोकशाहीच्या कार्यालय बीड येथे भावपूर्ण अभिवादन सभा घेण्यात आली . योगायोगाने आजच्या मराठवाडा मुक्ती दिनी भारतातील विविध भागातील थोर महापुरुषांचे विशेषतः दक्षिण भारतातील थोर परिवर्तनवादी पेरियार रामास्वामी, सिलोन (श्रीलंका) येथून भारतात आलेले अनागारिक धम्मपाल, क्रांतिकारक विचाराचे प्रबोधनकार ठाकरे , यांचे जयंती दिन तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांचा स्मृतिदिन असल्यामुळे त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले, तर 17 सप्टेंबरला ज्येष्ठ समाजसेवक जे.टी.साळवे यांचे दुःखद निधन झाले त्यामुळे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. भैय्यासाहेब आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता संपूर्ण हयातीत मोलाचे योगदान दिले.
ह्याप्रसंगी समता सैनिक दलाचे मेजर जनरल कॅप्टन राजाभाऊ आठवले यांनी महापुरुषांच्या जीवनातील संपूर्ण समाजउन्नती केलेल्या कार्याची सविस्तर माहिती दिली. वाचाल तर वाचालचे डी.जी. वानखेडे यांनी भैय्यासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत प्रिंटिंग प्रेस चांगल्या प्रकारे चालवला व महु ते चैत्यभूमी समता ज्योत काढून पद यात्रेतून मिळालेल्या दानातून चैत्यभूमीची निर्मिती मुंबई येथे केली. त्या महानकार्याबद्दल सविस्तरपणे माहिती दिली. प्रशांत वासनीक, अँड.तेजस वडमारे, महामानव अभिवादन ग्रुपचे जी.एम. भोले यानी देखील मराठवाडा मुक्ती संग्रामाबद्दल सविस्तर माहिती दिली. कालकथीत जे.टी. साळवे यांच्या जीवनातील विपशनेचे किती महत्त्व होते व त्यांचा आदर्श सर्वांनी ठेवणे कसे गरजेचे आहे हा त्यांचा जीवनपट समजावून सांगितला. प्रवक्ता लोकशाहीचे संपादक नितीन मुजमुले यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. कार्यक्रमास सेवानिवृत्त सीईओ पि.व्ही.बनसोडे, बी.जी. दळवी, महामानव अभिवादन ग्रुपचे बहुसंख्य सदस्य उपस्थित होते.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा