कॉस्मिक अबॅकस क्लासेसचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
बीड।एस.एम.न्युज़ - कॉस्मिक अबॅकस क्लासेस, बीड यांच्या वतीने आयोजित पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी हॉटेल ग्रँड यशोदा, राष्ट्रवादी भवन समोर, शिवाजीनगर, बार्शी रोड, बीड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायं. दैनिक बीड रिपोर्टर चे मुख्य संपादक तैय्यब सिकंदर शेख, संचालक – मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ लि. (महाराष्ट्र शासन उपक्रम) हे होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात तैय्यब सिकंदर शेख यांनी अबॅकस शिक्षणाचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासामध्ये त्याची भूमिका तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात आत्मविश्वासाने पुढे जाण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी कॉस्मिक अबॅकस क्लासेसच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खान सबिहा बेगम, सचिव – अंजुमन इशाअत-ए-तालीम, बीड, शेख अनिसुर रहमान, प्राचार्य – एस.एस.आर.ए. लॉ कॉलेज, बीड, श्रीमती सीमा मनोज ओस्तवाल, अध्यक्ष – गुरु आनंद महिला प्रतिष्ठान, बीड तसेच डॉ. शेख फय्याज़ आयुष भारत राष्ट्रीय अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती.
कॉस्मिक अबॅकस क्लासेसच्या संचालक शेख मुख़्तार यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम पार पडला. क्लासेसच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये शेख उम्मे हानी मुख़्तार यांच्या मार्गदर्शनाचा महत्त्वपूर्ण वाटा असून, गेल्या ८ वर्षांपासून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली असून, यावर्षी त्यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवत बीडच्या शैक्षणिक क्षेत्राची मान उंचावली आहे.
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाचे पालक, शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी कॉस्मिक अबॅकस क्लासेसच्या सर्व शिक्षक व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा