स्वच्छता सभापती निज़ाम शेख यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल कर नाही त्याला डर नाही - निज़ाम शेख
स्वच्छता सभापती निज़ाम शेख यांची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
कर नाही त्याला डर नाही - निज़ाम शेख
बीड।एस.एम.न्युज़ - गेल्या काही दिवसापासून बीड नगर परिषदेचे स्वच्छता सभापती शेख निजाम यांच्याविरुद्ध आंदोलन केले जात आहे. शेख निजाम यांनी तमाम शिवप्रेमींची जाहीर माफी मागितली होती परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीच्या वेळी मिरवणूक मार्गामध्ये नालीचे घाण पाणी साचण्याचे कारण देत मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले होते सदरील जयंती मिरवणुकीच्या वेळी झालेला प्रकार हा अत्यंत वाईट होता याप्रकरणी मा. नगराध्यक्ष श्रीमती प्रेमलता पारवे व तात्कालीन मुख्याधिकारी यांनी सदर प्रकरणाचे चौकशी करून संबंधितावर कर्मचाऱ्यावर जबाबदारी निश्चित केलेली करून त्यांच्या विरुद्ध नियमाप्रमाणे कार्यवाही केलेली आहे तरीसुद्धा शेख निजाम यांचे सामाजिक व राजकीय प्रतिमा मलीन करण्यासाठी व त्यांना बदनाम करण्यासाठी त्यांची सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे बदनामी करण्यासाठी महापुरुषांचा सहारा घेऊन बदनाम करण्याचा डाव करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे व सदरील प्रकार हा राजकीय द्वेषापटी करत असल्याचे दिसत आहे या एकंदरीत प्रकरणावर शेख निजाम यांच्या तक्रारीवरून सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणाऱ्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन बीड गुन्हा 175/2026 दिनांक 13/09/2026 दाखल झालेला असून पोलीस प्रशासन या बाबतीत सोशल सोशल मीडिया व याबाबत दोषी सर्व लोकांची तपासणी करून पुढील तपास करीत आहे.
तत्पूर्वी निज़ाम शेख यांनी बोलताना म्हटले की, मागे माझ्या मुलाखतीत अनाहूतपणे झालेला शब्दप्रयोग संदर्भात क्षमा मागितली मात्र मी न केलेल्या चुकीबद्दल का माफी मागावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान शक्तीने माझ्या मतदारांनी निवडून दिलेला मी असल्याने मी माफी वा राजीनामा हा विषय कसा असेल. माझी विंनती असेल कि आपल्यातले राजकीय वैर वैमनस्य साधण्यासाठी सामाजिक अस्मितांची ढाल करू नये.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा