अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात जिल्हाध्यक्षा रूपाली देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती पत्राचे वाटप
अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा थाटात
जिल्हाध्यक्षा रूपाली देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली नियुक्ती पत्राचे वाटप
बीड।एस.एम.न्युज़
अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडी, बीड जिल्ह्याच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती व पदग्रहण सोहळा थाटात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्षा रूपाली देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील याज्ञवल्क्य मंगल कार्यालय, जोशी गार्डनजवळ, शासकीय विश्रामगृहामागे, बीड येथे उत्साहपूर्ण वातावरणात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सचिव सौ. रेखा सोनावणे होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून ह.भ.प. श्रीमती प्रज्ञा भरतबुवा रामदासी तसेच सौ. रूपाली आठवले उपस्थित होत्या.
नवनियुक्त पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्षा सौ. भगवती भारत परदेशी, जिल्हा उपाध्यक्षा सौ. मनीषा श्रीधर मुंडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. सौ. रूपाली विश्वनाथराव सुलाखे, सौ.सुषमा भट, जिल्हा समन्वयक ॲड. सौ. गीता विनायकराव वझे, सौ.संगीता धनंजय देशपांडे, जिल्हा महिला संघटन प्रमुख सौ. कविता बडवे-देशमुख, जिल्हा महिला संघटन प्रमुख सौ. लता सुनीलराव राऊत, जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ. वैशाली सुहासराव पुरंदरे, जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ. कालिका एकनाथराव कवडे, कुमारी प्रगती सूर्यवंशी, प्रसिद्धी प्रमुख श्रीमती सविता शामसुंदर देव, सौ. रेणुका नितीन डांगे, कायदेविषयक सल्लागार प्रमुख सौ. संगीता अभिजित वैद्य-कोकीळ. गेवराई तालुका कार्यकारणी ता. अध्यक्ष सौ. शांता उमाप, उपाध्यक्ष सौ. मंगल ठोसर, सचीव अंजली कानगुडे, सरचिटणीस आशा पवार, महिला संपर्क प्रमुख अनिता मुळे, अंजली चाळक. महिला संघटन प्रमुख ज्योती राणा, सरचिटणीस सुर्वणा सुतार, प्रसिद्धी प्रमुख राणी पिसाळ, अर्चना खरात या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रं देण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने आणि जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख सौ. रूपाली जयंत देशपांडे यांनी आपल्या मनोगतात, “हे पद केवळ सन्मान नसून समाजासाठी काम करण्याची मोठी जबाबदारी आहे. महिलांच्या समस्या ऐकून त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे,” असा निर्धार व्यक्त केला. महिलांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आणि त्यांना आपला आवाज मांडण्यासाठी *‘महिला अभियान – माझी समस्या, माझा आवाज’* हा उपक्रम पुढील काळात राबविण्याची घोषणा केली. महिलांनी संघटित होऊन सामाजिक, सांस्कृतिक व महिला विषयक विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले. कार्यक्रमास महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि उपस्थितांचे जिल्हाप्रमुख सौ. रूपाली जयंत देशपांडे यांनी आभार मानले. “महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी संघटित होऊया, समाजासाठी कार्य करूया!” असे शेवटी म्हटले.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा