पुरस्कारदाते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्याच्या लायक आहेत का? त्यांचे कार्यकर्तृत्व काय? पुरस्कार देणाऱ्या संस्था, संघटना अधिकृत नोंद केलेल्या आहेत का?
पुरस्कारदाते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्याच्या लायक आहेत का? त्यांचे कार्यकर्तृत्व काय?
पुरस्कार देणाऱ्या संस्था, संघटना अधिकृत नोंद केलेल्या आहेत का?- एस.एम.युसूफ़ (मो.- 9021 02 3121)
समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या परंतु आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांनी आता पैसे घेऊन पुरस्कार देणारे पुरस्कारार्थींना सन्मानित करण्याच्या लायक आहेत का?त्यांचे कर्तुत्व काय? तसेच पुरस्कार देणाऱ्या संस्था, संघटना अधिकृत नोंद केलेल्या आहेत का? हेही पहावे. प्रत्येक पुरस्कारदात्याचे कार्यकर्तृत्व चांगले असेल ते निस्वार्थी, चांगले आणि अधिकृत नोंद केलेले असेल असेही नाही.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, पूर्वी समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्यांना वेगवेगळ्या संस्था, संघटना वगैरे कर्तबगारांच्या चांगल्या कार्याची दखल घेत विशेष कार्यक्रम घेऊन त्यांना समाजासमोर पुरस्कार देऊन सन्मानित करत होते. स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र एवढंच काय रोख रक्कम सुद्धा देत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून स्वहितार्थ चालविल्या जाणाऱ्या समाजातील अनेक संस्था, संघटना वगैरे स्वतःची नावे मोठी करण्यासाठी आणि लाखोंच्या अर्थार्जनासाठी विविध क्षेत्रातील सधन लोकांकडून आर्थिक देणगी-फंड म्हणून प्रत्येकी तीन-पाच ते दहा हजार रुपये घेऊन आर्थिक दान देणाऱ्या सधनांना वेगवेगळ्या नावांनी कार्यक्रम घेत पुरस्कार देऊन त्यांचा गुणगौरव करत असल्याचे आपण सर्वजण पाहतच आहोत. अशा गुणगौरव पूर्ण पुरस्कार समारंभात समाजासाठी झटणारे, हाल-अपेष्टा सोसणारे, यांना पुरस्कारार्थी म्हणून स्थान मिळत नाही. कारण असे लोक आपल्या स्पष्ट वक्तेपणामुळे खरं तेच बोलणारे, खरं तेच करणारे असल्याने ते पुरस्कारदात्यांना पैसे देऊन पुरस्कार घेऊ शकत नाहीत. त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने ते करत असलेल्या चांगल्या कामाला अशा आर्थिक देवाण-घेवाण झालेल्या पुरस्कार समारंभात महत्त्व दिले जात नाही. मात्र तीन ते दहा हजार रुपये दिलेल्या सधनांचा उदो-उदो करण्यात येतो. या बाबी लक्षात घेऊन समाजासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांनी असे विकतचे पुरस्कार घेणे तर दूर त्याकडे ढुंकूनही पाहू नये.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा