पावसासाठी सामूहिक नमाज़ चे आयोजन मुस्लिम बांधव रविवारी सकाळी करतील नमाज़ अदा
पावसासाठी सामूहिक नमाज़ चे आयोजन
मुस्लिम बांधव रविवारी सकाळी करतील नमाज़ अदा
बीड।एस.एम.न्युज़
पावसाळ्याचे चार पैकी साडेतीन महिने संपले असून आतापर्यंत पाहिजे तसा पाऊस पडला नसल्याने नदी,नाले, विहिरी, बोअर आटले आहेत. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून लावलेले पीक हातचे गेले आहेत. बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर जनतेसह पशूधनाला पिण्याचे पाणी आणि वापरासाठी पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. भयान दुष्काळ उंबरठ्यावर उभा आहे. या पार्श्वभूमीवर पाऊस पडावा म्हणून मजलिस-ए-उलमा बीड़ ने नमाज़-ए-इस्तिस्का चे आयोजन केले आहे. ही नमाज़ बालेपीर इदगाह येथे रविवार दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०८:३० वाजता पठण करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी ०८:०० वाजता उलमा-ए-दीन चे बयान (व्याख्यान) होणार आहे.
पाऊस पडावा म्हणून नमाज़-ए-इस्तिस्का नंतर मुस्लिम बांधव अल्लाह त्आला कडे सामूहिक दुवा मागणार आहे. बयान, नमाज़ व दुवा करिता मुस्लिम बांधवांनी हजारोंच्या संख्येने रविवार दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजायच्या अगोदर ईदगाह बालेपीर बीड़ येथे उपस्थित राहून पावसासाठी दुवा मागून अल्लाह त्आला ला राजी करावे असे आवाहन मजलिस-ए-उलमा बीड़ कडून करण्यात आले आहे. याची सर्व मुस्लिम बांधवांनी नोंद घ्यावी.
*नमाज़-ए-इस्तिस्का साठी ईदगाह ला येताना .....*
पाऊस पडावा म्हणून अल्लाह त्आला ला राज़ी करण्याकरिता नमाज़-ए-इस्तिस्का साठी येताना मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरून *वज़ू करून* निघावे. निघताना सोबत *जाय नमाज़ (मुसल्लाह्)* आठवणीने सोबत घ्यावा आणि शक्यतो *पायी चालून* ईदगाह येथे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा