उपप्राचार्य तारेख़ इरफ़ान शेख यांचा मित्रमंडळी कडून उत्स्फूर्त सत्कार

उपप्राचार्य तारेख़ इरफ़ान शेख यांचा मित्रमंडळी कडून उत्स्फूर्त सत्कार
बीड।एस.एम.न्युज़ -
जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील शिवशारदा पब्लिक स्कूलचे उपप्राचार्य तारेख़ (इरफ़ान) शफ़ीक़ शेख यांचा उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल नुकताच शारदा प्रतिष्ठान कडून अत्यंत प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. आपल्या या मित्राला नामांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने साप्ताहिक द स्कूल एक्सप्रेस कार्यालयात त्यांचा मित्रमंडळी कडून पुष्पगुच्छ, शाल देत पेढे भरवून उत्स्फूर्त सत्कार करण्यात आला.
यावेळी शुजा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष इमरान शेख, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी सफ़ीर शेख, गट शिक्षण विभागाचे साधन व्यक्ती शाकीर शेख, संपादक एजाज शेख, भारत सॉ मिल चे संचालक परवेज़ शेख, गृहरक्षक दलाचे जवान शानू शेख, मेहराज शेख, ॲड. ज़हीर खान, दैनिक सत्यवादी चे संपादक रेहान शेख आणि एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांची प्रमुख उपस्थिती होती.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा