नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एन.सी.एम.सी.) बद्दल अजय भोसरेकर यांच्या सखोल अभ्यासपूर्ण पत्रातील मुद्दे व मागण्या एस.टी. महामंडळाला देण्यात आलेले पत्र प्रवाशांसह वाचकांकरिता जशास तसे, फक्त "एस.एम.न्युज़ वेब पोर्टल" वर पहा
नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एन.सी.एम.सी.) बद्दल अजय भोसरेकर यांच्या सखोल अभ्यासपूर्ण पत्रातील मुद्दे व मागण्या
एस.टी. महामंडळाला देण्यात आलेले पत्र प्रवाशांसह वाचकांकरिता जशास तसे, फक्त "एस.एम.न्युज़ वेब पोर्टल" वर पहा
*अजय भोसरेकर*
मो.नं. *08806911999*
माप्र अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सदस्य, अभ्यास समन्वय समिती, अ भा ग्राहक पंचायत, लातूर, व पुणे,
Dt.07.09.2026.
प्रति,
१. मा. डॉ. माधव कुसेकर, (भा.प्र.से.)
उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), मुंबई.
Email: - vcmdmsrtc@gmail.com
२. मा. मुख्य महाव्यवस्थापक / संबंधित NCMC अधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. मुंबई,
विषयः -
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) च्या NCMC कार्डमुळे प्रवाशांना येणाऱ्या सर्व प्रमुख अडचणी, प्रवाशांच्या सुस्पष्ट मागण्या, विशेषतः NCMC कार्डमध्ये आगाऊ / पुरेशी रक्कम जमा करण्याची सक्ती नसावी, प्रवासाच्या वेळेवर नगदी, UPI किंवा इतर उपलब्ध पद्धतीने तिकीट काढण्याची मुभा असावी, या मुद्यांना प्राधान्य देऊन, आणि सर्व NCMC प्रवाशांच्या सार्वजनिक ग्राहकहित आणि आर्थिक हिताचे संरक्षण करण्याबाबत.
महोदय,
आपणास नम्र निवेदन पुढीलप्रमाणे करतो कि,
प्रवाश्यांसाठी-प्रवाश्यांनी सुरु केलेली प्रवाश्यांची, प्रवासी चळवळ
मूळ आणि आताचे ब्रीदवाक्यः १ जून १९४८ रोजी एसटीची पहिली बस धावली तेव्हापासून ते आजतागायत एसटी महामंडळाचे मुख्य आणि अधिकृत ब्रीदवाक्य "प्रवाशांच्या सेवेसाठी" हेच कायम आहे. यासोबतच ग्रामीण भागात एसटीचे महत्त्व सांगणारे "गाव तिथे एसटी" किंवा "जिथे रस्ता, तिथे एसटी" हे वाक्य देखील लोकप्रिय घोषवाक्य घोषवाक्य (Motto / संकल्प) आणि "सुरक्षित प्रवास" तर "बहुजन हिताय बहुजन सुखाय" हा मुख्य उद्देश असला पाहिजे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC (National Common Mobility Card) अनिवार्य केल्यानंतर प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना येणाऱ्या प्रमुख अडचणी आणि त्यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेतः -
> प्रवाशांना येणाऱ्या प्रमुख अडचणी
१. रजिस्ट्रेशन आणि वितरणामधील त्रुटी: कार्ड नोंदणी केंद्रांची अत्यंत कमी संख्या, अत्यंत मर्यादित वेळा (उदा. अनेक ठिकाणी फक्त २ तास) आणि अपुरा कार्ड पुरवठा यामुळे प्रवाशांना ५-६ वेळा फेऱ्या माराव्या लागत आहेत.
२. सव्र्व्हर डाऊन आणि तांत्रिक बिघाडः नोंदणी, कार्ड ॲक्टिव्हेशन आणि तिकीट काढण्याच्या वेळी सतत सव्र्व्हर डाऊन होण्याच्या समस्या उद्भवत आहेत.
३. बायोमेट्रिक (ठसे) न उमटणेः वयस्कर आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बोटांचे ठसे मशिनवर स्पष्ट न उमटल्याने त्यांची नोंदणी रखडत आहे.
> रिचार्ज सुविधेचा गोंधळः -
१. कार्डमध्ये बॅलन्स टॉप-अप करण्यासाठी सुटसुटीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पर्याय उपलब्ध नाहीत.
२. ग्रामीण भागातील प्रवाशांना कार्ड रिचार्ज करण्यासाठी ३० ते ३५ किलोमीटर दूर एसटी आगारात (डेपो) जावे लागत आहे.
३. वाहक (Conductors) आणि प्रवाशांमधील वादः कार्ड ॲक्टिव्ह नसणे किंवा मशिनवर रीचार्ज न होणे या
कारणांमुळे प्रवाशांना सवलत नाकारून पूर्ण भाड्याचे तिकीट काढावे लागत आहे, ज्यामुळे दररोज वाद निर्माण होत आहेत.
४. आर्थिक भार आणि किचकट प्रक्रियाः सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना १९९ रुपये कार्ड फी आणि किमान रक्कम (Minimum Balance) शिल्लक ठेवावी लागत असल्याने आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
> प्रवाशी आणि प्रवासी संघटनांच्या मुख्य मागण्याः -
१. सक्ती तातडीने रद्द करावी / मुदतवाढ द्यावीः सर्व प्रवाशांना कार्ड मिळेपर्यंत आणि यंत्रणा सुरळीत होईपर्यंत NCMC कार्डची सक्ती तात्काळ स्थगित करावी.
२. आधार कार्ड व जुने ओळखपत्र ग्राह्य धरावेः पर्यायी व्यवस्था पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा जुन्या पद्धतीनुसार सवलत तिकीट देणे सुरू ठेवावे.
> सुलभ रिचार्ज सुविधाः -
१. बस वाहकांकडेच (Conductors) तिकीट मशिनद्वारे कार्ड रिचार्ज करण्याची सुविधा द्यावी.
२. ग्राम पंचायत कार्यालये, स्थानिक नागरी सुविधा केंद्र किंवा यूपीआय (UPI) द्वारे सहज रिचार्ज
सुविधा साठी १.०६% खर्च बंद करावा व हि सेवा "निःशुल्क" उपलब्ध करावी.
३. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलतः ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना बायोमेट्रिक अट शिथिल करावी आणि गरज भासल्यास त्यांना घरपोच कार्ड वितरीत करावे.
४. नोंदणी केंद्रांची संख्या वाढवावीः प्रत्येक बस स्थानकावर आणि ग्रामीण भागात अतिरिक्त काउंटर उघडून नोंदणीची वेळ दिवसभर ठेवावी.
> प्रवाशांच्या प्रमुख अडचणी
१. कार्डमध्ये आगाऊ पुरेशी रक्कम ठेवण्याची सक्ती.
२. प्रवास किती होईल याचा अंदाज नसतानाही पैसे कार्डमध्ये जमा ठेवावे लागणे.
३. कार्डमध्ये पैसे नसल्यास तात्काळ तिकीट काढताना अडचण.
४. कार्डमध्ये पैसे असूनही मशीन / नेटवर्कच्या तांत्रिक अडचणीमुळे व्यवहार न होणे.
५. रोखीने / नगदीने तिकीट काढण्यास अडचण निर्माण होणे.
६. UPI द्वारे तिकीट काढण्याची सुविधा सर्व ठिकाणी उपलब्ध नसणे.
७. ऑनलाइन व्यवहार अयशस्वी झाल्यास पर्यायी व्यवस्था नसणे.
८. कार्ड रिचार्ज करण्यासाठी आगार किंवा केंद्रावर जाण्याची वेळ व खर्च.
९. ग्रामीण भागात कार्ड रिचार्जची सुविधा मर्यादित असणे.
१०. कार्ड मिळण्यासाठी किंवा सक्रिय करण्यासाठी अनावश्यक प्रक्रिया.
११. कार्ड हरवल्यास शिल्लक रक्कमेची चिंता.
१२. कार्ड खराब झाल्यास तातडीने पर्यायी व्यवस्था नसणे.
१३. तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना बसणे.
१४. नेटवर्क नसल्यास तिकीट व्यवहारात अडथळा.
१५. मशीन बंद असल्यास किंवा मशीनमध्ये बिघाड असल्यास पर्यायी तिकीट व्यवस्था स्पष्ट नसणे.
१६. ज्येष्ठ नागरिक व ग्रामीण प्रवाशांना डिजिटल प्रणाली वापरण्यात अडचणी.
१७. कार्डच्या नियमांची पुरेशी माहिती प्रवाशांना नसणे.
१८. वाहकांकडून वेगवेगळी व विविधता पूर्ण माहिती मिळणे.
१९. सवलतीस पात्र प्रवाशांना सवलत मिळण्यात अडथळे.
२०. कार्ड प्रणालीमुळे प्रवाशांवर अनावश्यक आर्थिक भार पडण्याची शक्यता.
> NCMC कार्डबाबत प्रवाशांच्या 30 मागण्याः -
१. आगाऊ रक्कम जमा करण्याची सक्ती नसावी, NCMC कार्डमध्ये ठरावीक किंवा पुरेशी रक्कम आगाऊ जमा ठेवणे बंधनकारक करू नये.
२. प्रवासाच्या वेळी पैसे देण्याची मुभा प्रवाशाला तिकीट काढताना त्यावेळी उपलब्ध असलेल्या कोणत्याही मान्य पद्धतीने पैसे देता यावेत.
३. नगदीने तिकीट काढण्याची पूर्ण मुभा NCMC कार्ड असो किंवा नसो, प्रवाशाला नगदी पैसे देऊन तिकीट काढण्याची सुविधा कायम ठेवावी.
४. UPI द्वारे तिकीट काढण्याची सुविधा प्रवाशाला UPI द्वारे तात्काळ तिकीटाचे पैसे भरण्याची सुविधा प्रत्येक बसमध्ये उपलब्ध करून द्यावी.
५. ऑनलाइन पेमेंटची सुविधा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बैंकिंग किंवा इतर अधिकृत ऑनलाइन माध्यमातून पेमेंट करण्याची सुविधा द्यावी.
६. कोणत्याही एका पद्धतीची सक्ती करू नये, फक्त NCMC कार्डनेच पैसे भरा किंवा तिकीट घ्या, अशी सक्ती करू नये.
७. पर्यायी पेमेंट व्यवस्था NCMC कार्ड, नगदी, UPI किंवा ऑनलाइन पेमेंट यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यास प्रवाशासाठी तात्काळ पर्यायी तिकीट व्यवस्था असावी.
८. तांत्रिक बिघाडाचा भार प्रवाशांवर टाकू नये मशीन, नेटवर्क, सव्र्व्हर किंवा कार्ड प्रणालीमध्ये बिघाड असल्यास त्यासाठी प्रवाशाकडून अतिरिक्त भाडे आकारू नये.
९. कार्डमध्ये पैसे नसल्यास प्रवास नाकारू नये कार्डमध्ये शिल्लक रक्कम नसल्यामुळे प्रवाशाला प्रवासापासून वंचित करू नये, त्याला नगदी / UPI / ऑनलाइन पद्धतीने तिकीट घेण्याची मुभा असावी.
१०. कार्ड रिचार्जची सक्ती करू नये प्रत्येक प्रवासापूर्वी कार्ड रिचार्ज करणे बंधनकारक करू नये.
११. किमान शिल्लक रक्कमेची सक्ती टाळावी कार्डमध्ये ठरावीक Minimum Balance ठेवण्याची सक्ती करू नये.
१२. प्रवाशाचे पैसे अडकू नयेत कार्डमध्ये जमा केलेली रक्कम सहज वापरता किंवा परत मिळवता येईल, अशी पारदर्शक व्यवस्था असावी.
१३. कार्ड रिचार्जची सोपी सुविधा रिचार्ज करायचा असल्यास आगार, बसस्थानक, ऑनलाइन व डिजिटल माध्यमातून सहज करता यावा.
१४. ग्रामीण भागात सुविधा वाढवावी ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांसाठी NCMC कार्ड वितरण व रिचार्ज केंद्रे उपलब्ध करावीत.
१५. ज्येष्ठ नागरिकांसाठी सोपी व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहाराची सक्ती न करता नगदी व प्रत्यक्ष तिकीटाची सुविधा उपलब्ध ठेवावी.
१६. सवलतीच्या प्रवाशांना अडथळा आणू नये ज्या प्रवाशांना शासनाने / महामंडळाने सवलत दिली आहे, त्यांना NCMC कार्डाच्या तांत्रिक कारणामुळे सवलतीपासून वंचित करू नये.
१७. कार्ड खराब झाल्यास पर्यायी तिकीट कार्ड खराब झाल्यास तत्काळ नगदी / UPI / ऑनलाइन पद्धतीने तिकीट देण्यात यावे.
१८. कार्ड हरवल्यास शिल्लक रक्कम सुरक्षित ठेवावी कार्ड हरवल्यास त्यातील शिल्लक रक्कम सुरक्षित ठेवून नवीन कार्डमध्ये हस्तांतरित करण्याची सुविधा असावी.
१९. कार्ड बंद / निष्क्रिय झाल्यास रक्कम परत मिळावी कार्ड बंद झाल्यास किंवा वापरता येत नसल्यास उर्वरित रक्कम परत मिळण्याची सोपी प्रक्रिया असावी.
२०. तिकीट नाकारले जाऊ नये कार्डमध्ये तांत्रिक अडचण आल्यास प्रवाशाला "तिकीट मिळणार नाही" असे सांगून प्रवासाची अडचण निर्माण करू नये.
२१. प्रत्येक बसमध्ये स्पष्ट सूचना NCMC कार्ड, नगदी, UPI आणि ऑनलाइन पेमेंटच्या सुविधांबाबत स्पष्ट माहिती बसमध्ये लावावी.
२२. वाहकांना योग्य प्रशिक्षण सर्व वाहकांना NCMC कार्ड तसेच पर्यायी पेमेंट पद्धतींबाबत योग्य प्रशिक्षण द्यावे.
२३. वाहकांना स्पष्ट लेखी आदेश प्रवाशांकडून नगदी / UPI / इतर मान्य पद्धतीने तिकीट घेण्याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
२४. तांत्रिक अडचणींसाठी तक्रार व्यवस्था कार्ड किंवा पेमेंटसंबंधी तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन / तक्रार नोंदणी व्यवस्था असावी.
२५. चुकीचे भाडे आकारल्यास परतावा तांत्रिक कारणामुळे सवलतीच्या प्रवाशाकडून जास्त भाडे घेतले असल्यास ते परत करण्याची प्रक्रिया सुलभ करावी.
२६. व्यवहाराची पावती अनिवार्य NCMC, UPI, नगदी किंवा ऑनलाइन कोणत्याही पद्धतीने तिकीट घेतल्यास प्रवाशाला तिकीट / व्यवहाराची पावती द्यावी.
२७. व्यवहार अयशस्वी झाल्यास पैसे अडकू नयेत UPI किंवा ऑनलाइन व्यवहारातून पैसे कट झाले पण तिकीट मिळाले नाही, तर रक्कम परत मिळण्याची स्पष्ट व जलद व्यवस्था असावी.
२८. कार्ड नसले तरी ही सेवा उपलब्ध असावी NCMC कार्ड नसणे हे प्रवास नाकारण्याचे किंवा सवलत नाकारण्याचे कारण ठरू नये, जिथे प्रवासी त्या सवलतीस पात्र आहे तिथे नियमानुसार पर्यायी ओळख / प्रक्रिया ठेवावी.
२९. प्रवाशांच्या हिताचा आढावा घ्यावा NCMC प्रणाली लागू केल्यानंतर प्रवाशांच्या तक्रारी, व्यवहारातील अडचणी आणि आर्थिक परिणामांचा नियमित आढावा घ्यावा.
३०. NCMC ही सुविधा असावी, सक्ती नव्हे NCMC कार्डचा उद्देश प्रवाशांना सुविधा देणे असावा, प्रवाशांवर आर्थिक किंवा तांत्रिक अडचण लादणे नसावे. त्यामुळे कार्ड सोबत नगदी, UPI आणि ऑनलाइन तिकीट व्यवस्था पर्याय म्हणून कायम उपलब्ध ठेवावी.
> प्रवाशांची सर्वात महत्त्वाची मागणीः -
ST -- प्रवाश्याच्या सेवेसाठी असल्यामुळे "NCMC" कार्डमध्ये आगाऊ पुरेशी रक्कम जमा ठेवण्याची किंवा Minimum Balance ठेवण्याची सक्ती करू नये. प्रवाशाला प्रवासाच्या वेळी नगदी, UPI, ऑनलाइन किंवा महामंडळाने मान्य केलेल्या कोणत्याही उपलब्ध पद्धतीने तिकीट काढण्याची पूर्ण मुभा असावी. कार्ड, मशीन, नेटवर्क किंवा सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडाचा कोणताही आर्थिक अथवा प्रवासाचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागू नये."
आपला विश्वासू,
सही
(अजय भोसरेकर)
१. कृपया हे पत्र सर्व वृतपत्र, नातेवाईक, सर्व मित्र, सर्व शेजारी यांना पाठवणे आहे.
२. प्रत्येकाला ST बस ने प्रवास करावा लागतो.
👇👇👇👇👇
*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा