Breaking News

पत्रकारिता क्षेत्रात जनहिताचा बुलंद आवाज़, दिलशाद एस.खान!

 

पत्रकारिता क्षेत्रात जनहिताचा बुलंद आवाज़, दिलशाद एस.खान!

‘मुंबई हलचल’च्या माध्यमातून अन्यायाविरोधात निर्भीड लढा; पत्रकार, वंचित आणि दुर्बळांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण संघर्ष

महाराष्ट्रातील पत्रकारिता, समाजसेवा आणि मानवाधिकार क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे दिलशाद एस. खान हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. ‘मुंबई हलचल’ या हिंदी दैनिकाचे संपादक म्हणून त्यांनी पत्रकारितेला केवळ बातमी मांडण्याचे माध्यम न ठेवता, सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि अन्यायाविरोधात आवाज उठविणारे प्रभावी व्यासपीठ बनविण्याचा प्रयत्न केला आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या समस्या प्रशासन आणि शासनाच्या निदर्शनास आणून देताना त्यांनी जनहिताला सातत्याने प्राधान्य दिले आहे. गरीब, असहाय्य, वंचित आणि दुर्बळ घटकांवर अन्याय झाल्यास त्यांच्या प्रश्नांना प्रसिद्धी देऊन संबंधित यंत्रणांकडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, ही त्यांच्या कार्याची विशेष ओळख मानली जाते.

पत्रकारिता क्षेत्रातील अडचणी, पत्रकारांची सुरक्षितता, त्यांचे अधिकार आणि सन्मान यासाठी दिलशाद एस. खान सातत्याने आवाज उठवत आले आहेत. पत्रकार हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, त्याला निर्भयपणे काम करण्यासाठी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळाले पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे.

मानवाधिकारांच्या प्रश्नांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय मिळावा आणि समाजातील प्रत्येक घटकाला समान सन्मान मिळावा, यासाठी त्यांनी पत्रकारिता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत.

दिलशाद एस. खान यांच्या कार्यातील आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक सलोखा. विविध धर्म, समाज आणि त्यांच्या थोर व्यक्तिमत्त्वांविषयी आदराची भावना ठेवत त्यांनी सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये त्यांच्याविषयी आपुलकी आणि विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

‘मुंबई हलचल’च्या माध्यमातून केवळ समस्या प्रसिद्ध करण्यापेक्षा त्या समस्या प्रशासनाच्या योग्य पातळीवर पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यावरही भर दिला जातो. सामान्य नागरिकांचा दबलेला आवाज शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांच्या पत्रकारितेतून सातत्याने केले जात असल्याचे दिसून येते.

मानवतेप्रती असलेली तळमळ, पत्रकारितेप्रती असलेली निष्ठा आणि समाजातील दुर्बळ घटकांसाठी उभे राहण्याची भूमिका यामुळे दिलशाद एस. खान यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरते.

दिलशाद एस. खान यांच्या निःस्वार्थ सामाजिक आणि पत्रकारितेच्या कार्याला, त्यांच्या आईच्या आशीर्वादाला आणि ‘मुंबई हलचल’च्या जनहिताच्या प्रयत्नांना मनःपूर्वक सलाम.

लेखन - पठाण अमरजान खान

(बीड जिल्हा प्रतिनिधी - दैनिक महाभारत)

संपर्क - 9325050246

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.

___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत