तायक्वांदो स्पर्धेत निर्वी मस्के ने पटकावले कांस्यपदक

तायक्वांदो स्पर्धेत निर्वी मस्के ने पटकावले कांस्यपदक
पुणे।एस.एम.न्युज़ -
नुकतेच पुणे येथे पार पडलेल्या तायक्वांदो स्पर्धेत निर्वी पुनम दिनकर मस्के हिने आठ ते नऊ वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक पटकावून कांस्यपदक मिळविले याबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
निर्वी ही सुप्रसिद्ध सौंदर्य तज्ञ डॉ. पूनम भालेराव आणि यूरोलॉजिस्ट डॉ. दिनकर मस्के यांची कन्या असून सीएम इंटरनॅशनल स्कूल पुणे ची विद्यार्थिनी आहे. तिने माजी आमदार विनायक आबा निम्हण यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या तायक्वांदो स्पर्धेत सहभाग घेतला होता. ही स्पर्धा सोमेश्वर फाउंडेशन च्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक सन्नी विनायक निम्हण यांनी आयोजित केली होती. यात विविध वयोगटातील मुले-मुलींनी सहभाग घेतला होता. यात निर्वी पूनम दिनकर मस्के हिने चमकदार कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावल्याने तिला स्पर्धेत कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले. तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे कोच जय संजय शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच समाजातील सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिने यापुढेही आपल्या खेळातून दैदिप्यमान कामगिरी करत नावलौकिक मिळवावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा