प्रभाग क्रमांक १७ व ८ मधील नागरिकांसह संपूर्ण शहरातील नव मतदारांनी मतदार यादीत नाव लावून घ्यावे डॉ. शेरखान यांचे बीड शहर वासियांना आवाहन
प्रभाग क्रमांक १७ व ८ मधील नागरिकांसह संपूर्ण शहरातील नव मतदारांनी मतदार यादीत नाव लावून घ्यावे
बीड।एस.एम.न्युज़ - प्रभाग क्रमांक १७ व ८ सह शहरातील नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत लावून घ्यावे. मतदार याद्यांची दुरुस्ती करणे चालू आहे. या अनुषंगाने भीमशक्ती सामाजिक संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शेरखान यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून आवाहन केले आहे.
निवडणूक विभागाकडून मतदार याद्यांमध्ये नवमतदारांची नावे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरिता सर्व नागरिकांनी आपआपली मुले व मुली ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहे, अशा सर्व नवमतदारांची नावे मतदार याद्यांमध्ये लावण्यासाठी त्वरितता व जागरूकता दाखवावी. बीड शहरातील प्रत्येक वार्डामध्ये नवमतदारांची नोंद घेण्याचे काम चालू आहे. भारताचे जबाबदार नागरिक म्हणून मतदार यादी मध्ये १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येकाचे नाव समाविष्ट करून घेणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. मतदार यादी मध्ये नाव लावून घेण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. ही बाब सन्माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब सुद्धा अधोरेखित करीत आहेत. तशी सूचना ही त्यांनी दिलेली आहे. जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे. तरी प्रभाग क्रमांक १७ व ८ सह बीड शहरातील नागरिकांनी १८ वर्षे पूर्ण केलेली आपली मुले व मुलींची नावे मतदार याद्यांमध्ये लावून घ्यावे असे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. शेरखान यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा