पवित्र पोर्टलवर उर्दू माध्यमाला न्याय; केंद्रप्रमुख पदोन्नतीबद्दल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचा सत्कार

पवित्र पोर्टलवर उर्दू माध्यमाला न्याय; केंद्रप्रमुख पदोन्नतीबद्दल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांचा सत्कार
*बीड।एस.एम.न्युज़ -* उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत पवित्र पोर्टलवर उर्दू माध्यमातील रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल तसेच केंद्रप्रमुख पदोन्नतीची प्रक्रिया राबविल्याबद्दल अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद बीडचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जितीन रहमान साहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या भरती व पदोन्नतीसंदर्भातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे उर्दू शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवित्र पोर्टलवर उर्दू माध्यमाची जाहिरात प्रसिद्ध होणे हा उर्दू शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह निर्णय असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
तसेच केंद्रप्रमुख पदोन्नती केल्याबद्दल संघटनेच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.जितीन रहमान साहेब यांचे विशेष आभार मानण्यात आले. उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहून भविष्यातही सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सत्कार प्रसंगी केंद्रप्रमुख श्रीमती सलमा मॅडम, अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष काझी मुशाहेद अजिज, कार्याध्यक्ष उस्मान खान साहेब, तालुकाध्यक्ष मोमीन मोहम्मद खैसर तसेच जिल्हा सहसचिव मोमीन जावेदमिया उपस्थित होते.
उर्दू शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटनेचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका यामुळे उर्दू माध्यमाच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा