डॉक्टरसह मुलावर जीवघेणा हल्ला; पत्नी व दुसऱ्या मुलालाही मारहाण डॉक्टरावर खाजगी तर दोन्ही मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
डॉक्टरसह मुलावर जीवघेणा हल्ला; पत्नी व दुसऱ्या मुलालाही मारहाण
डॉक्टरावर खाजगी तर दोन्ही मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरूबीड।एस.एम.न्युज़
शुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाची चे रूपांतर भांडणात झाले. त्यातून आरोपीने डॉक्टरसह मोठ्या मुलावर धारदार शस्त्राने वार करताच डॉक्टर बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडले. तेव्हा जमलेल्या जमावाने डॉक्टरसह मुलाला जिल्हा रुग्णालयात नेले पण गंभीर जखमी झालेल्या डॉक्टरवर जिल्हा रुग्णालयात योग्य उपचार उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून मोठ्या जखमी मुलासह लहान मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डॉक्टर च्या पत्नीने बीड शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बीड शहर पोलीस करत आहेत.
या घटनेनंतर बीड शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहेनशहा नगर गल्लीतील शेख अरफात ऊर्फ बब्बा शेख सलीम याची पत्नी आयशा व सासु दिलशात ह्या दोन्ही डॉक्टरच्या घरी आल्या व काहीएक न बोलता डॉक्टरचा छोटा मुलगा उमर यास दोन-तीन चापटा मारल्या. त्यावेळी का मारताय असे म्हणताच त्यांनी डॉक्टरच्या पत्नीला सुद्धा शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहान केली आणि दिलशात हीने शेख अरफात यास फोन करुन म्हणाली, तु लवकर ये यांच काम तमाम करायचं आहे. असे सांगुन बोलावुन घेतले. तो येताच त्याने डॉक्टरचा मोठा मुलगा मुलगा रेहान यास कशाचे तरी सह्याने दंडावर व डोक्यात मारल्याने रक्त येवु लागले व तो जखमी झाला. हे पाहून डॉक्टरला फोन करून बोलावून घेतले. तेव्हा डॉक्टर पाच मिनीटात मेहराज मस्जीद, शहंशाह नगर बीड येथे आले व अरफात यास असे का करता, का माझ्या मुलांना व पत्नीला विनाकारण मारहान करता असे म्हणताच अरफात व डॉक्टर यांचेमध्ये बाचाबाची सुरु झाली. त्यावेळी अरफात याने त्याचे हातातील धारधार शस्त्राने डॉक्टरच्या डाव्या बाजुस छातीवर, गळ्यावर जिवे मारण्याचे उद्देशाने वार केल्याने ते गंभीर जखमी होवुन खाली पडले. यावेळी जमलेला जमाव आणि आरडाओरडा बघून हल्ला करणारे सर्वजन पळुन गेले. त्यानंतर फिर्यादीचे भाऊ शेख अथर यांनी सरकारी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासुन सिरीअस असल्याने तुम्ही दुसरीकडे घेवुन जा असे सांगितल्याने त्यांना लोटस हॉस्पीटल बीड येथे भरती केले असुन तेथे त्यांच्यावर आय.सी.यु. कक्षात उपचार सुरू आहेत. तर मोठा मुलगा रेहान व छोटा उमर यांना दंडाला व डोक्याला मार लागून जखमी झाल्याने त्यांच्यावर सरकारी दवाखाना बीड येथे वॉर्ड क्रमांक 48 मध्ये उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी दिनांक 29/06/2026 रोजी रात्री 09.00 वा. आयशा अरफात ऊर्फ बब्बा शेख वय-22 वर्ष व तीची आई दिलशात वय-44 वर्ष (पुर्ण नावमाहित नाही), अरफात ऊर्फ बब्बा पिता शेख सलीम सर्व शहंशाह नगर बीड यांनी संगणमत करून डॉक्टर एजाज शेख, मोठा मुलगा रेहान शेख यांना जिवे मारण्याच्या दृष्टीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याने तसेच छोटा मुलगा उमर शेख ला मारहाण करणारे अरफात ऊर्फ बब्बा पिता शेख सलीम याच्यासह आयेशा अरफात शेख आणि दिलशात शेख यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नुसार 109, 118 (2) 118 (1), 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बीड शहर पोलीस करत आहेत.
👇👇👇👇👇
___________________________________________
___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा