Breaking News

२६ ऑगस्ट रोजी शमा-ए-रिसालतचा भव्य जुलूस

        २६ ऑगस्ट रोजी शमा-ए-रिसालतचा भव्य जुलूस

बीड।एस.एम.न्युज़ - दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजरत मोहम्मद मुस्तफा (स.) यांच्या योमे विलादत (जन्मदिन) निमित्त के.जी.एन. ग्रुप सीरत कमिटी, बीड यांच्या वतीने शमा-ए-रिसालतच्या परवान्यांचा अजीमुश्शान जुलूस (मिरवणूक) आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य जुलूस (मिरवणूक)  दि. २६ ऑगस्ट २०२६ बुधवार रोजी (१२ रब्बीउल अव्वल १४४८ हि.) दुपारी १ वाजता दर्गाह हजरत शहंशाहा वली (रह.) येथून निघणार आहे.

         जुलूसाचा मार्ग चांदणी चौक, भोलेबाबा मस्जिद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, माळीवेस, धोंडीपुरा, बलभीम चौक, कारंजा, जुनी भाजी मंडई, बुंदलपुरा, राजुरीवेस, बशीरगंज असा राहणार आहे.
       यानंतर बशीरगंज येथे एक तास जुलूसाचा थांबा राहणार असून, त्यानंतर रिपोर्टर ऑफिस (जुने एस.पी. ऑफिस) मार्गे जुलूस पुन्हा दर्गाह हजरत शहंशाहा वली (रह.) येथे पोहोचणार आहे.
       जुलूसानंतर बाद नमाज-ए-असर मस्जिद गरीब नवाज KGN येथे फातेहा व तब्बारुक वाटप करण्यात येणार आहे. तसेच हजरत मोहम्मद मुस्तफा (स.) यांच्या मू-ए-मुबारक (दाढीचे केस) यांचे दर्शन (जियारत) घेण्याचीही भाविकांना संधी उपलब्ध होणार आहे.
          या पवित्र व धार्मिक सोहळ्यात सर्व बिरादराने-मिल्लत बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जुलूसात सहभागी व्हावे, तसेच कार्यक्रम शांतता, शिस्त व बंधुभावाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन के.जी.एन. ग्रुप सीरत कमिटी, बीड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत