आयुष आयुर्वेदिक एण्ड एक्युपंक्चर क्लिनिक चा उद्घाटन सोहळा थाटात मान्यवरांकडून डॉ. अयाज़ शेख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
आयुष आयुर्वेदिक एण्ड एक्युपंक्चर क्लिनिक चा उद्घाटन सोहळा थाटात
बीड।एस.एम.न्युज़
शहरातील बलभीम चौक परिसरात राहुल झेरॉक्स बिल्डिंग मध्ये डॉ. अयाज़ जलील शेख यांच्या आयुष आयुर्वेदिक एण्ड एक्युपंक्चर क्लिनिक चा भव्य उद्घाटन सोहळा दिनांक १९ ऑगस्ट २०२६ बुधवार रोजी मोठ्या थाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मौलाना आज़ाद आर्थिक विकास महामंडळाचे संचालक तथा सायं. दैनिक रिपोर्टरचे संपादक तय्यबभाई शेख, सेवानिवृत्त प्राध्यापक तथा पत्रकार जावेद पाशा शेख, मुख्याध्यापक तथा पत्रकार सिराज खान आरजू, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, एस.एम. न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ़, संपादक कामरान शेख, अदनान खान यांच्यासह विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांच्या मांदियाळीत आयुष आयुर्वेदिक एण्ड एक्युपंक्चर क्लिनिक चा भव्य उद्घाटन सोहळा थाटात साजरा करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा हकीम जलील शेख (फतेहाबादी), डॉ. फैय्याज़ शेख, डॉ. अयाज़ शेख या पिता-पुत्रांना सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.
आयुष आयुर्वेदिक एण्ड एक्युपंक्चर क्लिनिक मध्ये एकाच ठिकाणी आयुर्वेदिक उपचार, एक्युपंक्चर थेरेपी, फायर कर्मिंग थेरेपी, हिजामा थेरेपी, नॅचरोपैथी, कायरोप्रैक्टिक थेरेपी, योग एवं परामर्श, युनानी मेडिसिन्ससह स्वस्थ जीवनशैली विषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा लाभ रुग्णांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा