Breaking News

भूमापन कार्यालयाकडून "धनीला धतुरा अन् चोरांना मलिदा!" बीडच्या भूमापन कार्यालयाची झाडाझडती घ्या - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे

भूमापन कार्यालयाकडून "धनीला धतुरा अन् चोरांना मलिदा!"बीडच्या भूमापन कार्यालयाची झाडाझडती घ्या - एस.एम.युसूफ़, रमेश गंगाधरे

उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करून तक्रार निवारण कक्ष स्थापन करा

बीड।एस.एम.न्युज़

बीडच्या भूमापन कार्यालयाची झाडाझडती घेऊन दोषी अधीक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे तसेच भूमापन कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तक्रार निवारण कक्ष स्थापन करून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशा मागण्या एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केल्या आहेत.
             या विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या काही वर्षांपासून बीडच्या भूमापन अधीक्षक कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. एकाची जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे करणे, मूळ मालकाला याचा थांगपत्ता लागू न देणे, मूळ मालकाला माहिती मिळाल्यानंतर त्याने केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न करणे, अशाप्रकारे  अन्यायकारक कारभार होऊ लागल्याच्या तक्रारीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे मूळ मालक आणि ट्रस्टी छळले जात आहेत.
             मूळ मालकांच्या जमिनींशिवाय मंदिर, मस्जिद, स्मशान, कब्रस्तान सारख्या स्थळांच्या इनामी किंवा जागिरी नसलेल्या रजिस्टर्ड जमिनी सुद्धा भूमापन कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे भूमाफिया आणि भूचोरांच्या नावे लावल्या जात असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. मंदिर, मस्जिद, स्मशान, कब्रस्तान सारख्या ट्रस्ट च्या नावे असलेल्या मोकळ्या सहन जागा सुद्धा ट्रस्टींना कुठलीही पूर्व कल्पना किंवा सुचना न देता भूमाफिया किंवा भूचोरांच्या नावे केल्या जात असल्याच्या तक्रारीही सातत्याने वाढू लागल्या आहेत.
          भूमापन अधीक्षक कार्यालयात *"धनीला धतुरा अन् चोरांना मलिदा"* मिळू लागला आहे. यामुळे मूळ मालकांना तसेच ट्रस्टींना न्याय मागण्यासाठी नाविलाजास्तव कोर्टाची पायरी चढावी लागत आहे. जिथे दिवाणी दावे वर्षानुवर्षे रखडून पडलेले आहेत. यामुळे मूळ मालकांसह ट्रस्टींना विनाकारण हाल अपेष्टा सोसून शारीरिक आणि मानसिक त्रासासह अतिरिक्त मोठा आर्थिक भार सहन करून वर्षानुवर्षे कोर्टात हेलपाटे मारावे लागत आहे.
                 या सर्व बाबींकडे जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन बीडच्या भूमापन अधीक्षक कार्यालयाची झाडाझडती घेऊन दोषी अधीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.
             तसेच जमिनीच्या मूळ मालकांसह मंदिर, मस्जिद, स्मशान, कब्रस्तान सारख्या स्थळांच्या ट्रस्टींना त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बीडच्या भूमापन कार्यालयात एक विशेष असे तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे. तिथे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून संबंधितांवर भूमापन कार्यालयाकडून अन्याय होत असल्यास तिथल्या तिथे ताबडतोब न्याय मिळवून देण्यात यावा. अशी मागणी एस.एम.युसूफ़ आणि रमेशराव गंगाधरे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत