Breaking News

नवनियुक्त शिक्षणाधिकारी यांच्या सत्कारानिमित्त उर्दू शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

नवनियुक्त शिक्षणाधिकारी यांच्या सत्कारानिमित्त उर्दू शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

बीड।एस.एम.न्युज़ - अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने नवनियुक्त शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मा. जयश्री चव्हाण मॅडम जिल्हा परिषद बीड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बीड जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शिक्षक व शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर अत्यंत सकारात्मक व सविस्तर चर्चा करण्यात आली.
विशेषतः नेकनूर अध्यापक विद्यालयातील शिक्षकांची कमतरता, माध्यमिक स्तरावरील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न, तसेच गेवराई येथे सुरू असलेल्या बीड जिल्ह्यातील एकमेव उर्दू ज्युनिअर कॉलेजमधील रिक्त पदांची भरती याबाबत संघटनेच्या वतीने ठोस मागण्या मांडण्यात आल्या.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष काझी मुशाहेद अजीज यांनी उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या विविध समस्या व प्रलंबित प्रश्न शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. शिक्षकांची उपलब्धता, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणे, रिक्त पदे भरणे आणि उर्दू माध्यमाच्या शैक्षणिक संस्थांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे या विषयांवर विशेष चर्चा झाली.
मा.शिक्षणाधिकारी मॅडम यांनी संघटनेने मांडलेल्या प्रश्नांची सकारात्मक दखल घेत संबंधित विषयांवर आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. त्यामुळे उर्दू शिक्षकांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.
या वेळी उपशिक्षणाधिकारी मा.अंजुम मॅडम, केंद्रप्रमुख  सलमा मॅडम, उस्मान खान सर,मोमीन अलीमोद्दीन सर,  मोमीन मोहम्मद खैसर सर, मोमीन जावेद सर, मोमीन साजेद एकबाल, शेख अब्दुल्ला तसेच शेख समीर साहेब यांची विशेष उपस्थिती होती.
उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या न्याय्य प्रश्नांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करीत असून, प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे या प्रश्नांना लवकरच योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
“उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटना सदैव तत्पर असून, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनासोबत सकारात्मक संवादातून प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील,” असे संघटनेचे अध्यक्ष काझी मुशाहेद अजीज यांनी यावेळी सांगितले.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत