Breaking News

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य गायन स्पर्धा थाटात संपन्न

स्वातंत्र्यदिनानिमित्ताने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य गायन स्पर्धा थाटात संपन्नएम.एम.शेख, डॉ. प्रियांका देशमाने, कृष्णा पांगरे यांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला

बीड।एस.एम.न्युज़ - स्वातंत्र्यदिनानिमित्ताने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात भव्य गायन स्पर्धा घेण्यात आली. यात स्थानिक गायक-गायिकांसह जिल्हाभरातील गायक-गायिकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सहभागी गायक-गायिकांमधून विजेत्या गायक-गायिकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी सर्व गायक-गायिकांचे मान्यवरांनी कौतुक केले.

आयोजकांकडून आलेला कार्यक्रमाचा इतिवृत्तांत खालीलप्रमाणे -

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा भाजपच्या वतीने आयोजित देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा बीडच्या यशवंतरावजी चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
   या कार्यक्रमास राज्याच्या पर्यावरण व पशु संवर्धन मंत्री लोकनेत्या मा. पंकजा ताईसाहेब मुंडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले, त्यांना आशीर्वाद दिले.
   या प्रसंगी बीडच्या दबंग माजी खासदार डॉ.प्रितम ताई मुंडे, जिल्हा अध्यक्ष शंकर भाऊ देशमुख, बीड विधानसभा भाजप नेते डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर, प्रमुख पाहुणे आणि जेष्ठ गायक आदरणीय भरत अण्णा लोळगे , आदित्य भैय्या सारडा, जेष्ठ नेते नवनाथ अण्णा शिराळे,डॉ. सारिका ताई क्षीरसागर,नगर सेवक शुभम भैय्या धूत, प्रा. देविदास नागरगोजे,  सलीम भाई जहांगीर,गणेश लांडे,रामदास भाऊ बडे, शांतीनाथ डोरले,संजय आंधळे,ईर्शाद भाई शेख, डॉ.लक्ष्मण जाधव,विक्रांत हजारी,मुन्ना फड,गणेश पुजारी,,ऍड. संगीता ताई धसे, शैला ताई मुसळे, डॉ. अभय वणवे, सुनील मिसाळ, संग्राम बांगर, दत्तप्रसाद जाधव,मोहिते तात्या, धनंजय वाघमारे, विलास बामणे,फारूक भाई शेख, केशव बडे यांच्यासह पदाधिकारी, स्पर्धक, पालक आणि मोठ्या संख्येने देशप्रेमी रसिक श्रोते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ऍड. संगीता ताई धसे यांनी तर आभार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांनी मानले.
स्पर्धेच्या परीक्षणाची जवाबदारी प्रा. डॉ. राहुल सोनवणे आणि प्रा. डॉ. प्रियांका देशमाने यांनी पार पाडली.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत