Breaking News

जिल्हा रुग्णालय थांब्याच्या कॅबिन मधून वाहतूक नियंत्रक गायब! एसटी महामंडळाचे नव्याचे नऊ दिवस संपले काय?

जिल्हा रुग्णालय थांब्याच्या कॅबिन मधून वाहतूक नियंत्रक गायब     एसटी महामंडळाचे नव्याचे नऊ दिवस संपले काय?

बीड।एस.एम.न्युज़

शहरातील बार्शी रोडवरील जिल्हा रुग्णालय थांब्याच्या कॅबिन मधून गेल्या अनेक दिवसांपासून वाहतूक नियंत्रक सातत्याने गायब असल्याने एसटी महामंडळाचे नव्याचे नऊ दिवस संपले काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
        या विषयी सविस्तर वृत्त असे की, गेल्या महिन्यात एसटी महामंडळाने बार्शी रोडवरील जिल्हा रुग्णालय येथे अधिकृत बस थांबा जाहीर करून शिवाजीनगर पोलीस ठाणे आणि जिल्हा रुग्णालयाच्या मधोमध वाहतूक नियंत्रकासाठी एक केबिन आणून ठेवली. एसटीचे वाहतूक नियंत्रण दोन-चार दिवस थांबले नंतर मात्र आजतागायत त्या केबिनमध्ये एसटी महामंडळाचा एकही वाहतूक नियंत्रक फिरकत नाही. केबिनमध्ये ठेवलेले टेबल-खुर्च्या धुळखात पडून आहेत. यामुळे या थांब्यावरून बस पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना त्यांना जायच्या ठिकाणची बस आली की नाही किंवा कधी येणार याची माहिती मिळत नाही. तसेच येथे वाहतूक नियंत्रकासाठी ठेवलेली केबिन ही शोभेची वस्तू झाली आहे. यामुळे एसटी महामंडळाचे नव्याचे नऊ दिवस संपले काय? असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होऊ लागला असून प्रवाशांच्या सेवेसाठी येथे दरदिवशी सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाहतूक नियंत्रकाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत