हाथ-पाय काढण्याची भाषा करणाऱ्या दुबालेला अटक कधी? - डॉ.जितीन वंजारे
बीड।एस.एम.न्युज़ - भर मीडिया समोर हाथ पाय काढण्याची, खून करण्याची भाषा करणारा पोलीस बॉईज संघटनेचा म्होरक्या राहुल दुबाले याला पोलीस प्रशासनाने योग्य वेळी मुसक्या आवळाव्या, त्याला अटक करावे. त्याच्या चिथावणींखोर वक्तव्यामुळे महाराष्ट्रात शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांच्या आणि अभिजित दिपके यांच्या समर्थकांत असंतोषाचं वातावरण तयार झाले आहे. अभिजित दिपके यांच्या घरासमोर हजारो पोलीस आजपर्यंत येऊन गेले. वेगवेगळे नेते, अधिकारी, पदाधिकारी येऊन गेले. पोलिसांना चहा, नाश्ता, जेवण पुरवताना अभिजित दिसले. फक्त एक पीएसआय ज्याने भेटायला येणाऱ्या लोकांना अपमानास्पद वागणूक दिल्या कारणाने आणि अभिजित यांना अडवल्याने त्या पी.एस.आय. वर अभिजित दिपके भडकले. याचा उहापोह करणारा संधीसाधू पोलीस बॉईज वाला रस्त्यावर उतरू देणार नाही, हाथ पाय काढू अशी भाषा करत आहे. त्याच्यावर योग्य कार्यवाही करून त्याला अटक करावी नसता आम्ही रस्त्यावर उतरू. असा ईशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ. जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी दिला आहे.
पोलीस प्रशासन हे भारतीय न्याय संहितेचे रक्षक असतात. संरक्षण देणे हे त्यांचे नैतिक कर्तव्य पण दिल्ली पोलिसांनी अमानुष हाणमार करून विद्यार्थ्यांना जखमी केले. इज्जतीवर हात टाकला, तेव्हा पोलीस बॉईज वाला उबाळे कुठे होता? तेव्हा नाही का दिसला पोलिसांचा अत्याचार, अन्याय, रक्षक भक्षक झालेले आणि आता त्याला पुळका आलेला दिसतो आहे. अरे पोलिसांचा अपमान करायचा असता तर अभिजित सगळ्यांसोबत असंच वागला असता. तिथे रोज शिफ्ट बदलून शेकडो पोलीस अधिकारी, पदाधिकारी येतात. त्यांना कोणालाच अभिजित काही बोलला नाही. मग या पी.एस.आय. ने भेटण्यावाचून अडवल्याने त्याला अभिजित दिपके बोलले. याची पार्श्वभूमी लक्षात न घेता आम्ही असं करू तसं करू, हाथ-पाय तोडू, रस्त्यावर फिरू देणार नाही अशी असंवैधानिक भाषा करणारा राहुल दुबाले आणि त्याचे कार्यकर्ते अभिजित दिपके यांच्यावर हल्ला करू शकतात. म्हणून त्याला अटक करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि अभिजित दिपके यांचे मेव्हणे डॉ.जितीन वंजारे यांनी केली आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा