रूपाली जयंत देशपांडे यांची अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी निवड
बीड।एस.एम.न्युज़ - अखिल भारत हिंदू महासभा या संघटनेच्या महिला आघाडी बीड जिल्हाप्रमुख पदावर सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या रूपाली जयंत देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किरण राजेंद्र चव्हाण यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून नियुक्ती जाहीर केली आहे.
रूपाली देशपांडे या सामाजिक, महिला सक्षमीकरण, जनजागृती तसेच विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नियुक्तीनंतर रूपाली देशपांडे यांनी संघटनेच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार व्यक्त करताना, "महिलांचे सक्षमीकरण, समाजात जनजागृती, सामाजिक ऐक्य, सेवा कार्य आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन," असे म्हटले. या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा