Breaking News

"माझी समस्या, माझा आवाज" द्वारे महिलांच्या प्रश्नांना मिळणार नवं व्यासपीठ सामाजिक कार्यकर्त्या रूपाली जयंत देशपांडे यांची माहिती

"माझी समस्या, माझा आवाज" द्वारे महिलांच्या प्रश्नांना मिळणार नवं व्यासपीठसामाजिक कार्यकर्त्या रूपाली जयंत देशपांडे यांची माहिती

बीड।एस.एम.न्युज़ - अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर रूपाली जयंत देशपांडे यांनी जिल्ह्यातील महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी “महिला संवाद अभियान – माझी समस्या, माझा आवाज” हा उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
या अभियानाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत. महिला सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगार, शासकीय योजनांचा लाभ, कायदेशीर मार्गदर्शन तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर महिलांशी संवाद साधला जाणार आहे.
महिलांनी मांडलेल्या प्रश्नांची योग्य नोंद घेऊन संबंधित शासकीय यंत्रणा व तज्ज्ञांच्या माध्यमातून त्यावर कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. केवळ समस्या ऐकून न घेता त्या समस्यांच्या निराकरणासाठी शक्य ते प्रयत्न करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे रूपाली देशपांडे यांनी सांगितले.
महिलांना आपल्या समस्या मोकळेपणाने मांडण्यासाठी सुरक्षित आणि सकारात्मक व्यासपीठ मिळावे, तसेच ग्रामीण व शहरी भागातील महिलांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांना योग्य दिशा मिळावी, यासाठी या अभियानाचा जिल्हाभर विस्तार करण्याचा मानस आहे.
महिलांच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ
महिलांच्या सामाजिक प्रश्नांसोबतच त्यांच्या कला, संस्कृती, प्रतिभा आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच बीड जिल्ह्यात महिलांसाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार असून, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
याबाबत बोलताना रूपाली देशपांडे म्हणाल्या, “महिलांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडाव्यात, त्यांचा आवाज योग्य ठिकाणी पोहोचावा आणि त्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा व्हावा, यासाठी ‘महिला संवाद अभियान’ सुरू करत आहोत. महिलांच्या समस्या ऐकण्याबरोबरच त्यांच्या कला, प्रतिभा आणि आत्मविश्वासालाही व्यासपीठ देण्याचा आमचा प्रयत्न असेल.”
“माझी समस्या, माझा आवाज” या संकल्पनेतून प्रत्येक महिलेला आपले म्हणणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून, बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला या अभियानाशी जोडले जावे आणि आपल्या समस्या व सूचना मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहन अखिल भारत हिंदू महासभा महिला आघाडीच्या बीड जिल्हाप्रमुख रूपाली जयंत देशपांडे यांनी केले आहे. त्यांच्याशी 8888955539 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत