श्री. गजानन महाराज पालखीचे बीड शहरात आगमन भाविक भक्तांनी घेतले हजारोंच्या संख्येने दर्शन
श्री. गजानन महाराज पालखीचे बीड शहरात आगमन
भाविक भक्तांनी घेतले हजारोंच्या संख्येने दर्शन
बीड।एस.एम.न्युज़ - श्री संत सद्गुरु श्री गजानन महाराज यांचे मोठ्या उत्साहात बीड शहरात आगमन झाले व सर्व बीड शहरातील व बीड शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व भाविक भक्त यांनी श्री संत गजानन महाराजांचे जागोजागी श्री गजानन महाराजांचे स्वागत केले व हजारो भाविक भक्तांनी घेतली श्री संत गजानन महाराजांचे दिव्य स्वरूपाचे श्रीचे दर्शन घेतले.
श्रीक्षेत्र शेगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री संत शिरोमणी गजानन महाराज यांची पायी वारी पालखी द्वारी पालखी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये हजारो भाविक भक्तांच्या टाळकऱ्यांच्या मृदंगाचार्यांच्या भगवे झेंडे भगव्या पताका या सर्व साहित्यासहित श्रीक्षेत्र पंढरपूरकडे श्री विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या निमित्ताने रवाना झाली होती श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री आषाढी एकादशी हा महोत्सव उत्सव श्रीक्षेत्र पंढरपूर येथील विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्या गावाकडे म्हणजेच श्रीक्षेत्र शेगाव या निवासस्थानाकडे श्रीं ची पालखी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी रवाना होत आहे याच पार्श्वभूमीवर आज बीड शहरांमध्ये श्री संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांची पालखी बीड शहरांमध्ये आल्यानंतर मोठ्या उत्साहात श्रींच्या पालखीचे आगमन झाले आगमन होताच मोठ्या जयघोषामध्ये श्री गजानन महाराज की जय हो या मोठ्या जय घोषामध्ये ढोल व ताशाच्या फटाक्यांच्या व मंगलमय वाद्याच्या गजरामध्ये श्री गजानन महाराजांचे मोठ्या उत्साहात जागोजागी स्वागत करण्यात आले व सर्व बीड शहरातील व बीड शहराच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील परिसरातील सर्व भक्तांनी येऊन श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले व श्री संत गजानन महाराज मुक्कामी बीड शहराचे ग्रामदैवत असलेले श्री माता खंडेश्वरी देवी या परिसरामध्ये श्री संत श्री शिरोमणी गजानन महाराज यांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी देखील हजारो भाविक भक्तांनी श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले याच पार्श्वभूमीवर कुक्कडगावच्या सुनंदा कुलकर्णी काकु यांनी देखील श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेतले व तसेच बीड शहरांमध्ये अतिशय उत्कृष्ट एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या भावी तहसीलदार पूजा घोलप मॅडम यांनी व त्यांच्या मातोश्री घोलप काकू यांनी देखील श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले व श्री संत गजानन महाराजांकडे सर्वांनी मंगलमय असे उत्कृष्ट प्रार्थना केली सगळीकडे चांगल्या प्रकारे पाऊस पडावा सगळे लोक सुखी असावेत कोणीही दुःखी असू नये सर्व नागरिक निरामय असावेत कुणालाही कुठला आजार असू नये व श्री संत गजानन महाराजांची अखंड कृपा सर्वावर राहावी अशी मंगलमय प्रार्थना यावेळी उपस्थित सर्व भाविक भक्तांकडून खंडेश्वरी देवी मंदिर परिसरामध्ये श्री संत गजानन महाराजांच्या चरणी करण्यात आली यावेळी येथे उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे नेते तथा बीड नगर परिषदेचे माजी सभापती तथा महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे पाटील यांनी देखील श्री संत गजानन महाराज यांचे दर्शन घेतले व त्यांच्याकडे उत्कृष्ट अशी लोक कल्याणकारी मंगलमय प्रार्थना केली तसेच येथे उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते गोविंद भांगे लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर सह सर्व भाविक भक्त मोठ्या हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा