सर्व सामान्यांसह व्यवसायिकांना वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नाही- पो.नि. शितलकुमार बल्लाळ
सर्व सामान्यांसह व्यवसायिकांना वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नाही- पो.नि. शितलकुमार बल्लाळ
बीड।एस.एम.न्युज़
शहराच्या अहमदनगर रोडवरील एका हॉटेलमध्ये खाऊन बिल न देणाऱ्या आणि हॉटेल चालकाने बिल मागितल्यानंतर त्याच्या डोक्यात बियरची बाटली लोखंडी रॉड ने मारहाण करून पळालेल्या दोन गुंडांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. ही घटना एक ऑगस्ट रोजी घडली होती.
या गुंडांच्या अटकेनंतर बोलताना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ म्हणाले की, रस्त्यावर गुंडगिरी करून दहशत माजवणे, एखाद्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकास दमदाटी करून त्यांच्याकडून पैसे उकळणे, दादागिरी करणे अशा गुंडांना अद्दल घडविण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. सर्व सामान्यांसह व्यवसायिकांना वेठीस धरणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीची गय केली जाणार नाही असा इशारा दिला असून नागरीकांनी अशा गुंडांना न घाबरता तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा