Breaking News

उत्तम राठोड यांचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर संघटनेकडून हृदयी सत्कार


उत्तम राठोड यांचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर संघटनेकडून हृदयी सत्कार

बीड।ए.एम.न्युज़ - शहरातील नामांकित चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय ग्रंथपाल तथा बीड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेत्तर संघटना, बीडचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तम जेमा राठोड हे नियत वयोमानानुसार दि. ३१ जुलै २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ, समर्पित व उल्लेखनीय सेवेचा गौरव करण्यासाठी दि. ०५ ऑगस्ट २०२६, बुधवार रोजी सायंकाळी हॉटेल राजलक्ष्मी, बीड येथे हृदयी सत्कार केला.
                या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय डावकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मोहसीन, संदीप वणवे, प्रसिद्धी प्रमुख बहिर सर, बाळासाहेब साळुंके, खमर सर, एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उत्तम राठोड यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार व फेटा देऊन सन्मान करत त्यांच्या कार्याचा गौरव करून व पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

👇👇👇👇👇

S.K.P. Motor Driving School
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत