दिमाखदार सोहळ्यात मुख्याध्यापक उस्मान खान यांचा सेवापुर्ती सन्मान
दिमाखदार सोहळ्यात मुख्याध्यापक उस्मान खान यांचा सेवापुर्ती सन्मान
मुख्याध्यापक उस्मान खान शाईस्ता खान हे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार शिक्षण क्षेत्रातून सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा बीड शहरातील गॅलेक्सी लॉन्स येथे दिमाखदारपणे साजरा करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात शिक्षण क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी होती.
मुख्याध्यापक उस्मान खान यांनी प्रथम शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य बजावताना हजारो विद्यार्थी घडविले. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजाला नव्या दिशा व नवी ऊर्जा देत अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केले. थोडी थोडकी नव्हे तर ३८ वर्षे शिक्षण क्षेत्र, शाळा आणि विद्यार्थ्यांची सेवा करत नियत वयोमानानुसार मंगळवार दि. ३० जून २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले.
यानिमित्ताने गॅलेक्सी फंक्शन हॉल, बार्शी नाका, बीड येथे बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात सेवानिवृत्त मुख्याध्यापक उस्मान खान शाईस्ता खान यांना सा. द स्कूल एक्सप्रेस चे मुख्य संपादक एजाज शेख, सेवानिवृत्त उपशिक्षणाधिकारी अब्दुल माजेद काज़ी, सेवानिवृत्त शिक्षक ख़्वाजा एकबालोद्दीन, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा विद्यमान जिल्हा संपर्क अधिकारी खतीब मिसबाहूल आबेदीन सय्यद, एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ़ यांनी भरभरून शुभेच्छा देत सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी खूप सार्या सदिच्छा व्यक्त केल्या.
👇👇👇👇👇
___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा