पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासन गुन्हेगारी संपुष्टात आणण्यास असमर्थ? नऊ महिन्यापूर्वी पत्रकाराच्या मुलाचा खून तर काही दिवसापूर्वी डॉक्टर व त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला एस.एम.न्युज़ ने मांडलेले भाकीत दुर्दैवाने खरे ठरू लागले!
पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासन गुन्हेगारी संपुष्टात आणण्यास असमर्थ?
नऊ महिन्यापूर्वी पत्रकाराच्या मुलाचा खून तर काही दिवसापूर्वी डॉक्टर व त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला
एस.एम.न्युज़ ने मांडलेले भाकीत दुर्दैवाने खरे ठरू लागले!
बीड।एस.एम.न्युज़
नऊ महिन्यांपूर्वी बीड शहरातील पत्रकार देवेंद्र सिंह ढाका यांच्या मुलाची माने कॉम्प्लेक्स चौकात अत्यंत क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. तेव्हा एस.एम.न्युज़ ने पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला उद्देशून तयार केलेल्या बातमीत भाकीत केले होते की, "बीडची अति जलद गतीने क्रूरतेकडे वाटचाल" या भाकिताला नऊ महिने होत नाही तोच शहेनशहा नगर भागात काही दिवसांपूर्वी डॉक्टर एजाज़ शेख यांच्यासह त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात डॉक्टर अति गंभीर झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून ते मृत्यूशी झुंज देत आहेत. हे दोन्ही प्रकरण पाहता समाजातील काही क्रूर स्वभावाचे आदमखोर तरुण समोरच्या व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ले करू लागल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अशाप्रकारे हल्ले करणारे समाजविघातक तरुण जेवढ्या क्रूरपणे प्राणघातक हल्ले करू लागले आहेत ते पाहता पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने ही तेवढ्याच आक्रमकपणे अशा समाज विघातक तरुणांची धरपकड करून तुरुंगात डांबावे आणि त्यांच्या विरोधात न्यायालयात असा मजबूत खटला दाखल करावा की असे आदमखोर, हल्लेखोर पुन्हा त्यांच्या आयुष्यात तुरुंगा बाहेर आले नाही पाहिजेत. या दृष्टीने पोलिसांची तपास यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनाने कार्य केले तरच समाजाला लागलेली अशा तरुणांची समाजविघातक किड संपुष्टात येईल. अन्यथा चांगल्या लोकांवर असेच हल्ले होत राहतील. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
*हत्यारं येतात कुठून?*
अशा प्रकारे हल्ले करणाऱ्यांकडे हत्यारं येतात कुठून? प्राणघातक हत्यारे ते स्वतः आणतात की त्यांना पुरविले जातात? कुठे तयार होतात? कशाप्रकारे त्यांच्याकडे येतात? त्याची बाजारपेठ कुठे आहे? जीव घेणारी हत्यारे एवढ्या सहजासहजी अशा आदमखोर समाज विघातक तरुणांकडे येतातच कशी? असे अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होऊ लागले आहेत. या सर्व प्रश्नांची पाळेमुळे खणून पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला उत्तरे शोधावी लागेल.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा