Breaking News

'शाम-ए-रफी' गायन स्पर्धेत मज़हरुद्दीन शेख सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने सन्मानित मुंबई येथे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला!

'शाम-ए-रफी' गायन स्पर्धेत मज़हरुद्दीन शेख सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने सन्मानित

मुंबई येथे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला!

बीड।एस.एम.न्युज़

हिंदीसह अनेक भाषेत आपल्या सुमधुर गाण्यांनी आधुनिक तानसेन, गायनातील कोहिनूर हिरा, विश्वरत्न म्हणून नावाजले गेलेले चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायक मरहूम मोहम्मद रफी साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने मुंबई येथे घेण्यात आलेल्या 'शाम-ए-रफी' या प्रतिष्ठित गायन स्पर्धेत बीड शहरातील प्रसिद्ध गायक तथा मुस्लिम समाजातील पहिले संगीत विशारद मज़हरुद्दीन शेख यांनी आपल्या शास्त्रशुद्ध व सुमधुर आवाजात बैजू बावरा या हिंदी चित्रपटातील 'तू गंगा की मौज मै जमना का धारा' हे गीत गाऊन उपस्थित रसिक श्रोत्यांसह परीक्षकांचीही मने जिंकत स्पर्धेतील 'सर्वोत्कृष्ट गायक' हा मानाचा पुरस्कार मिळवून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यांना हा पुरस्कार मोहम्मद रफी साहेबांचे चिरंजीव मोहम्मद शाहिद रफी यांच्या हस्ते देण्यात आला.
        शाम-ए-रफी ही गीत संगीताची स्पर्धा एसवायएनए प्रॉडक्शन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. याचे आयोजन सलीम शेख यांनी केले होते. मुंबई येथील गोरेगाव स्थित सुर्वे स्टुडिओ मध्ये दिनांक २६ जुलै २०२६ रविवार रोजी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची व रोमहर्षक झाली. स्पर्धेत मुंबईसह राज्यभरातील विविध भागांतून आलेल्या अनेक गायकांनी सहभाग नोंदविला होता. यात मज़हरूद्दीन शेख यांनी आपल्या शास्त्रशुद्ध व सुमधुर गीत गायनाने रसिक श्रोत्यांसह परीक्षकांचीही मने जिंकून स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गायक हा पुरस्कार पटकावून बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यांनी मिळविलेल्या या सन्मानाने त्यांचे मित्र मंडळी सह संगीत क्षेत्रातील सर्व सहकाऱ्यांकडून विशेष अभिनंदन होत असून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्याकडून यापुढेही गीत-संगीत क्षेत्रात सदैव उत्कृष्ट कामगिरी घडत राहो. अशा सदिच्छाही व्यक्त केल्या जात आहेत.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत