Breaking News

बीड नगरपरिषदेच्या प्रांगणात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पुतळा उभारणार! बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अ‍ॅड.गोविंद शिराळे यांची सूचना

बीड नगरपरिषदेच्या प्रांगणात लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पुतळा उभारणार!

बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक अ‍ॅड.गोविंद शिराळे यांची सूचना

बीड।एस.एम.न्युज़ - बीड जिल्ह्याला देशाच्या नकाशावर मानाचे स्थान मिळवून देणारे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा बीड नगरपालिकेच्या समोरील भागात उभारण्यात यावा अशी सूचना भाजपा नगरसेवक अ‍ॅड.गोविंद शिराळे यांनी बीड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सूचना केली.  हा मांडलेला प्रस्ताव आज सभागृहाने सर्वानुमते मंजूर केला.
बीड नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलतांना भाजपा नगरसेवक अ‍ॅड.गोविंद शिराळे म्हणाले की, न.प.चे पहिले नगराध्यक्ष द्वारकादास मंत्री, महाराष्ट्राचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे सभागृहात मांडलेली ही सूचना अत्यंत महत्त्वाची आणि आदराची असून लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे बीड जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी असलेले योगदान खूप मोठे असून त्यांनी बीड शहरासाठी बीड नगर परिषदेच्या माध्यमातून  बीड शहराच्या पाणी पुरवण्यासाठी माजलगाव बॅक वॉटर योजनेसाठी युतीच्या काळात 95 कोटी रुपये फंड दिला होता. त्यामुळे आज संपूर्ण बीड शहराला पाणी पुरवठा होत आहे. तसेच त्यांनी बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे बीडची ओळख संपूर्ण देशाला करून देणारे संघर्षयोद्धा, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा पुतळा नगरपरिषदेच्या प्रांगणातील मुख्य भागात बसवण्यात यावा, अशी सूचना अ‍ॅड.गोविंद शिराळे यांनी सभागृहापुढे मांडली असता न.प.सभागृहाने यावर ठराव घेवून स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचा पुतळा बसविण्यात येणार असल्याचे एकमताने मंजूर केले. राज्याच्या पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी खा.डॉ. प्रितमताई मुंडे, भाजपा नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे, भाजपच्या गटनेत्या डॉ.सारिकाताई क्षीरसागर व न.प.तील सर्व सन्माननीय सदस्यांचे सहकार्य लाभले. हा निर्णय जाहीर होताच बीडमधील कार्यकर्त्यांमध्ये आणि जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी अ‍ॅड.गोविंद शिराळे यांनी बीड शहरातील वीज, पाणी, रस्ता, नाली, नळ, घरकुल, गार्डन, मंदिर स्वच्छता, मावेजा, जिल्हा व सत्र न्यायालयातील, शहरातील सर्व नागरिकांच्या मूलभूत पायाभूत प्रश्नांवर सूचना बीड नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये मांडली.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत