Breaking News

कर्तव्यदक्ष बीएलओ प्रभाकर उंबरे, चेतन धुरंधरे, रमण कुलकर्णींमुळे एसआयआर प्रक्रिया विनासायास या त्रिमूर्तीमुळे मतदारांची डोकेदुखी झाली कमी

कर्तव्यदक्ष बीएलओ प्रभाकर उंबरे, चेतन धुरंधरे, रमण कुलकर्णींमुळे एसआयआर प्रक्रिया विनासायास

         या त्रिमूर्तीमुळे मतदारांची डोकेदुखी झाली कमी

बीड।एस.एम.न्युज़

मतदारांसाठी सुरू करण्यात आलेली एसआयआर प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदारांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशा अवस्थेत बीएलओ म्हणून नियुक्त करण्यात आलेले प्रभाकर उंबरे, चेतन धुरंधरे आणि रमण कुलकर्णी या त्रिमूर्तीने ही किचकट प्रक्रिया अत्यंत चांगल्या पद्धतीने आत्मसात करून आतापर्यंत विनासायास पार पाडत आहेत.
              याविषयी सविस्तर वृत्त असे की, या तिघांनीही बीएलओ म्हणून कार्य करताना कर्तव्यात कोणतीही कसूर केली नाही. त्यांना दिवस-रात्र कधीही मतदारांनी फोन करून कोणतीही माहिती विचारली तरीही चिडचिड न करता, न वैतागता ते प्रत्येकाला अत्यंत सामोपचाराने माहिती देऊन एसआयआर चे कार्य अगदी शंभर टक्के व्यवस्थितरित्या करीत आहेत. यामुळे ही प्रक्रिया सुरू होण्याअगोदर त्यांना कधीही न भेटलेल्या, न ओळखणाऱ्या मतदारांनाही ते आपलेसे वाटत आहेत. एसआयआर प्रक्रिया तंतोतंत पार पडावी आणि एकही मतदार मतदार यादीत नाव येण्यापासून वंचित राहू नये ही बाब लक्षात घेऊन हे तिन्ही बीएलओ दिवस-रात्र कार्य करीत असल्याने मतदारांची डोकेदुखी कमी झाली आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत