Breaking News

एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम गीत-संगीताच्या मोफत कार्यक्रमाचे आयोजन; रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे!

                 एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम 

            गीत-संगीताच्या मोफत कार्यक्रमाचे आयोजन

        रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे!

        एम.एम.शेख        युसूफ़ पठाण     एस.एम.युसूफ़


बीड।एस.एम.न्युज़

येत्या ३१ जुलै रोजी चित्रपटसृष्टीतील अजरामर गायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम या गीत-संगीताच्या मोफत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा गायक एम.एम.शेख, मॅनेजमेंट हेड युसूफ़ पठाण, एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.
           गीत-संगीताचा हा कार्यक्रम पीस बुक डेपो चे संचालक, गायक तथा आयोजक एम.एम.शेख दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सादर करीत आहेत. त्यांच्यासोबतच ज्येष्ठ संगीत विशारद मज़हरूद्दीन शेख, डॉ. प्रियंका देशमाने (एम.ए.पीएचडी म्युझिक), सैलानी शेख, गायक तथा सूत्रसंचालक आकाश जाधव, अस्मिता सुरवसे ललिता लांडगे, संध्या जाधव, निशा उजगरे, मुजीब सय्यद हे गायक-गायिका आपली गायन कला सादर करणार असून साऊंड सिस्टिम ची जबाबदारी नेहमीप्रमाणे कृष्णा पांगरे सांभाळणार आहेत.
              एम.एम.शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने अजरामर पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एक शाम मोहम्मद रफी साहब के नाम हा कार्यक्रम विना खंड सादर करीत आहेत.
               दरवर्षी या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांची उत्स्फूर्त उपस्थिती असते. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढत चालली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात सहभागी असणारे सर्व गायक कलाकार विनामूल्य हा कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मरहूम मोहम्मद रफी साहब यांना श्रद्धांजली वाहतात.
             दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा सदाबहार गीतांचा मोफत कार्यक्रम येत्या शुक्रवार दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कॅनॉल रोड, बीड येथे सायंकाळी ०७:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्हाभरातील रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक तथा गायक एम.एम.शेख, मॅनेजमेंट हेड युसूफ़ पठाण, एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले आहे.

👇👇👇👇👇

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत