अटल अमृत योजनेत आपच्या सादेक सय्यद यांचा भ्रष्टाचाऱ्यांना "उच्च" हाबाडा बीडच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेप्रकरणी हायकोर्टाची दखल; संबंधितांना नोटिसा
अटल अमृत योजनेत आपच्या सादेक सय्यद यांचा भ्रष्टाचाऱ्यांना "उच्च" हाबाडा
बीडच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेप्रकरणी हायकोर्टाची दखल; संबंधितांना नोटिसा
बीड।एस.एम.न्युज़ - बीड शहरातील 114 कोटी रुपयांच्या अटल अमृत पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पक्षाचे बीड शहराध्यक्ष सय्यद सादेक यांनी दाखल केलेल्या याचिकेची छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. याचिका स्वीकारून संबंधित अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
याचिकेनुसार, सुमारे 114 कोटी रुपयांची योजना असूनही जवळपास 100 कोटी रुपये खर्च झाल्यानंतरही बीड शहरातील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी माहितीच्या अधिकार (आरटीआय) अंतर्गत माहिती मागवूनही प्रशासनाने समाधानकारक प्रतिसाद न दिल्याने सय्यद सादेक यांनी न्यायालयाचे दार ठोठावले.
उच्च न्यायालयाने संबंधित अधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नोटिसा बजावत 28 जुलै 2026 पर्यंत न्यायालयात आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ही याचिका छत्रपती संभाजीनगर येथील ॲड. पंकज कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आली असून, बीड येथील ॲड. प्रवीण नेहरकर आणि ॲड. शिवाजी सपकाळ यांनीही या प्रकरणात कायदेशीर कामकाज पाहिले.
👇👇👇👇👇
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा