Breaking News

बीड शहर पोलीस ठाण्यात झेंड्याच्या चबुतऱ्याची अल्पावधीतच दुरावस्था स्वातंत्र्य दिनापर्यंत दुरुस्ती होईल का? - एस.एस.युसूफ़*

बीड शहर पोलीस ठाण्यात झेंड्याच्या चबुतऱ्याची अल्पावधीतच दुरावस्था

स्वातंत्र्य दिनापर्यंत दुरुस्ती होईल का? - एस.एस.युसूफ़

बीड।एस.एम.न्युज़

कोट्यावधी रुपये खर्चून कबाड गल्ली येथे बीड शहर पोलीस ठाण्याची नवी टोलेजंग इमारत बांधण्यात आली. तिथे वर्ष होत नाही तोच इमारती समोर बांधण्यात आलेला झेंड्याचा चबुतरा दुरावस्थेत गेला आहे. चबुतऱ्याच्या एका बाजूचा कोपरा तुटल्याने तेथील स्टील खांब निखळून पडले आहे. लवकरच स्वातंत्र्य दिन (१५ऑगस्ट) येणार असल्याने तोपर्यंत या चबुतऱ्याची दुरुस्ती होईल का? असा प्रश्न या अनुषंगाने एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, शासकीय-प्रशासकीय इमारती कोणत्याही विभागाच्या असो, त्या बनविताना शासकीय तिजोरीतून मुक्त हस्ते कोट्यावधी रुपयांची उधळण केली जाते. एकदा इमारत तयार झाली की त्याकडे त्या इमारतीमध्ये कर्तव्य बजावणारे अधिकारी असो की कर्मचारी ते कधीच गांभीर्याने पाहत नाहीत. यामुळे कोट्यावधींच्या इमारतीची अल्पकाळातच नासधूस सुरू होते. यामुळे कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या इमारतींना मोठ्या प्रमाणात गालबोट लागते. अशाच प्रकारे बीड शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीला सुद्धा झेंड्याच्या चबुतऱ्याचा कोपरा तुटून स्टील खांब आडवा झाल्याने गालबोट लागले आहे. हा गुणवत्तेचा विषय आहे. अल्पावधीतच तूट-फूट झाल्याने इमारतीचे बांधकाम कोणत्या दर्जाचे झाले असेल, याबद्दल शंकाही उपस्थित होत आहे. चबुतरा दुरुस्त व्हावा म्हणून वरून (आकाशातून) कुणी येऊन काम करणार नाही तर तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाच त्याकडे लक्ष देऊन दुरुस्ती करून घ्यावी लागेल परंतु त्याकरिता कर्तव्यावर असलेल्या प्रत्येकाची इच्छाशक्ती पाहिजे. पुढील महिन्यात आपल्या देशाचे स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ ऑगस्ट येणार आहे ते साजरे करण्यासाठी अनेक शासकीय-प्रशासकीय इमारतींमध्ये आपल्या देशाचा तिरंगा झेंडा फडकविला जातो. हे लक्षात घेता १५ ऑगस्ट पर्यंत तरी बीड शहर पोलीस ठाणे येथे झेंड्याच्या चबुतऱ्याची दुरुस्ती होईल? का असा प्रश्न एस.एम.युसूफ़ यांनी उपस्थित केला आहे.
👇👇👇👇👇

*गीर गाईचे शुद्ध दूध आणि तूप आता तुमच्या घरपोच*
*पवार डेअरी फार्म – शुद्धतेची नवी व्याख्या!*
___________________________________________

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत