ज्येष्ठ पत्रकार एस.एम.युसूफ यांना प्रतिष्ठित "राज्यस्तरीय ऑल टाईम बेस्ट रिपोर्टर गौरव पुरस्कार" जाहीर!
ज्येष्ठ पत्रकार एस. एम. युसूफ यांना प्रतिष्ठित "राज्यस्तरीय ऑल टाईम बेस्ट रिपोर्टर गौरव पुरस्कार" जाहीर!
गेल्या १५ वर्षांपासून लेखणी आणि 'डुबकी लगाव' आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या निर्भीड पत्रकाराचा होणार बहुमानबीड।एस.एम.न्युज़
आपल्या लेखणीच्या जोरावर गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारितेत अविरत सेवा बजावणारे आणि बीडमधील स्थानिक समस्यांसाठी थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे मुक्त पत्रकार तथा एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक एस. एम. युसूफ यांना यंदाचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठित "राज्यस्तरीय ऑल टाईम बेस्ट रिपोर्टर सर्वोत्कृष्ट मुक्त पत्रकार जीवनगौरव पुरस्कार २०२६" जाहीर झाला आहे. 'साप्ताहिक युवा लोकमित्र' वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 'युवा लोकमित्र परिवार'च्या वतीने या सर्वोच्च सन्मानाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
'साप्ताहिक युवा लोकमित्र'तर्फे पत्रकारिता, समाजकारण आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या खऱ्या लढवय्यांचा व गुणवंतांचा गौरव केला जातो. यंदाच्या उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने एस. एम. युसूफ यांच्या गेल्या दीड दशकातील निर्भीड पत्रकारितेची आणि आगळ्यावेगळ्या जनआंदोलनांची दखल घेऊन या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची एकमुखाने निवड केली आहे.
एस. एम. युसूफ हे केवळ बातम्या लिहिणारे पत्रकार नसून, समाजाच्या वेदनांना वाचा फोडणारे एक संवेदनशील आणि धडाडीचे व्यक्तिमत्त्व आहेत. गेल्या १५ वर्षांपासून पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी नेहमीच शोषित, वंचित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने आपली लेखणी चालवली आहे. प्रशासकीय अनास्था आणि लोकहितैषी कामांमधील दिरंगाई यांविरुद्ध त्यांचा आवाज नेहमीच बुलंद राहिला आहे.एस. एम. युसूफ यांच्या आंदोलनाचा बाणा अत्यंत अनोखा आणि प्रशासनाचे डोळे उघडून त्यांना हादरवून सोडणारा आहे. बशीरगंज ते जिल्हा रुग्णालय हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता गेल्या २५ ते ३० वर्षांपासून अतिशय दुरवस्थेत, खितपत पडला होता. या रस्त्याच्या निर्मितीसाठी त्यांनी अवघ्या एका वर्षात प्रशासनाविरुद्ध 'व्यंगात्मक निषेध आंदोलन', 'भीक मांगो आंदोलन' आणि थेट रस्त्यावरील खड्ड्यात 'बेशरम अंघोळ आंदोलन' करून प्रशासनाला हा रस्ता चांगला तयार करण्यास भाग पाडले. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळेच आज हा रस्ता दिमाखात उभा आहे. शहराची मुख्य ओळख असलेले ऐतिहासिक 'कारंजा टॉवर' अत्यंत दुरवस्थेत गेले होते. ही दुरवस्थता पाहून युसूफ यांनी आपल्या लेखणीतून "बीड नगरपालिका, मी कारंजा टॉवर बोलतोय..." हा अत्यंत मर्मभेदी व तडफदार लेख लिहिला, ज्याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली आणि कारंजा टॉवरचा कायापालट झाला. याशिवाय, 'खासबाग ते मोमीनपुरा' या दोन्ही भागांना जोडण्यासाठी पूल तयार व्हावा, म्हणून ते दरवर्षी न चुकता नदीच्या पात्रात 'डुबकी लगाव आंदोलन' करतात. शहरातील प्रत्येक सामाजिक आंदोलनात आणि नागरिकांच्या हक्काच्या लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
२० जून रोजी भव्य सोहळ्यात वितरण
हा दिमाखदार आणि गौरवशाली पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवार, २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता 'ताज पॅलेस', कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज व मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याच गरिमामयी उपस्थितीत एस. एम. युसूफ यांच्या १५ वर्षांच्या तपस्येचा आणि संघर्षाचा विशेष गौरव करण्यात येईल.
*चौकट -*
एस. एम. युसूफ यांनी गेल्या १५ वर्षांत बीडमध्ये पत्रकारितेचा एक नवा मापदंड निर्माण केला आहे. केवळ वृत्त गोळा करणे इतकेच मर्यादित न ठेवता, खासबाग ते मोमीनपुरा पुलाच्या निर्मितीसाठी दरवर्षी स्वतः पाण्यात 'डुबकी लगाव' आंदोलन करून त्यांनी जनसामान्यांच्या संघर्षाला आपली लेखणी अर्पण केली आहे. अशा खऱ्या, निर्भीड आणि 'ऑल टाईम बेस्ट' पत्रकाराचा सन्मान करताना युवा लोकमित्र परिवाराला सार्थ अभिमान वाटत आहे."
*— शेख ताहेर जाफर (संपादक, साप्ताहिक युवा लोकमित्र, बीड)*
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बीड जिल्ह्यातील पत्रकार बांधव, विविध सामाजिक संघटना, राजकीय नेते, तरुण वर्ग आणि नागरिक व मित्रपरिवाराकडून एस. एम. युसूफ यांच्यावर अभिनंदनाचा उत्स्फूर्त वर्षाव होत आहे.
👇👇👇👇👇
*विशेष सुचना*
बीड शहराच्या मध्यवर्ती भागात लवकरच लिखाण कार्य सुरू करणार आहे
वेळ - सकाळी ०९:०० ते रात्री ०९:००पर्यंत
*- एस.एम.युसूफ़*
संपर्क - *9021 02 3121*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा