शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेतून मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी 'धर्म - इस्लाम' हा पर्यायच गायब "धर्म - इस्लाम" या पर्यायाचा समावेश करा - एस.एम.युसूफ़
शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेत मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी "धर्म - इस्लाम" हा पर्यायच गायब असल्याने तो समाविष्ट करण्यात यावा तसेच शासकीय-प्रशासकीय पातळीवरील कोणत्याही कामासाठी मुस्लिम विद्यार्थी व नागरिकांची माहिती घेताना "धर्म - इस्लाम" ची स्पष्ट नोंद घेण्यात यावी. अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (दोन्ही), गृहमंत्री, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, अल्पसंख्यांक मंत्री, तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक यांच्याकडे केली आहे.
याविषयी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरावयाच्या नामावली मध्ये मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता "धर्म - इस्लाम" हा पर्याय देण्यातच आलेला नाही. त्यात धर्म - मुस्लिम, जात - मुस्लिम असे पर्याय देण्यात आलेले आहेत. जे की सर्वस्वी चुकीचे असून त्यात मुस्लिम विद्यार्थ्यांकरीता "धर्म - इस्लाम" हा पर्याय उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.
मुस्लिम हा समाज आहे, तो धर्म नाही किंवा पोटजात ही नाही. इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर टीसी घेऊन येणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांच्या टीसीवर "धर्म - इस्लाम, जात - मुस्लिम" असे स्पष्ट लिहिलेले असूनही शासकीय तंत्रनिकेतन मध्ये प्रवेश मिळविण्याकरिता नाव नोंदणी करणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी संगणकामध्ये "धर्म - इस्लाम" हा पर्याय देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही मोठ्या प्रमाणात गोची होत आहे.
प्रवेश मिळविण्यासाठी नाव नोंदणी करताना मुस्लिम विद्यार्थ्यांना धर्म व जात दोन्हीही नाविलाजास्तव मुस्लिम लिहावे लागत आहे. अशा पद्धतीने चुकीची माहिती प्रवेश प्रक्रियेत नोंदविण्यात आली तर शासकीय तंत्रनिकेतन मधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना पुढे चालून मोठ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात त्रास होऊ नये. "इस्लाम धर्माचा" स्पष्ट उल्लेख शासकीय तंत्रनिकेतनच्या संगणकामध्ये नोंद व्हायला हवा.
"एक अल्लाह ला मानणाऱ्या प्रत्येक मुस्लिमाचा धर्म हा इस्लाम आहे." धर्म मुस्लिम नाही, धर्म हा इस्लामच आहे. म्हणून शासकीय तंत्रनिकेतन मधील प्रवेश प्रक्रियेची नोंद करण्यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांकरीता "धर्म - इस्लाम" हा पर्याय चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याआधी समाविष्ट करावा आणि विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात होणाऱ्या संभाव्य त्रासापासून वाचवावे.
तसेच शासकीय-प्रशासकीय पातळीवरील कोणत्याही कामासाठी मुस्लिम विद्यार्थी असो की नागरिक त्यांची माहिती घेताना "धर्म - इस्लाम" अशी स्पष्ट नोंद संगणकामध्ये घेण्यात यावी. संगणकात हा पर्याय नसल्यास त्याचा समावेश करण्यात यावा. अशी मागणी एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या निवेदनाची प्रत शासकीय तंत्रनिकेतन बीड चे प्राचार्य यांना ही देण्यात आली आहे. निवेदनावर एस.एम. युसूफ़ यांच्यासह डॉ. संजय तांदळे, डॉ. गणेश ढवळे यांची नावे व सह्या असून निवेदन देताना सादिक भाई, अशोक येडे, मुबीन शेख, डी.जी. तांदळे, युनूस शेख, बाजीराव ढाकणे यांचीही उपस्थिती होती.
👇👇👇👇👇
___________________________________________
*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*





कोणत्याही टिप्पण्या नाहीत
टिप्पणी पोस्ट करा