Breaking News

ज्या महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी मजबूत वट्टे-पायऱ्या बांधायला लावले त्याच महापुरुषांच्या .....

ज्या महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी मजबूत वट्टे-पायऱ्या बांधायला लावले त्याच महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होण्याचा मान - एस.एम.युसूफ़

बीड।एस.एम.न्युज़

छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती बीड शहराच्या इतिहासात प्रथमच साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने छत्रपती शाहू महाराजांचा अर्धाकृती पुतळा असलेल्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण मैदानात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी ज्या महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी मजबूत वट्टे आणि पायऱ्या बीड नगर परिषदेला निवेदन देऊन तद्नंतर हा मुद्दा प्रसिद्धी माध्यमातून मांडल्याने येथे पायऱ्या आणि वट्टे चांगले बांधण्यात आले. आज त्याच महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होण्याचा मान मिळाला असे प्रतिपादन एस.एम.न्युज़ चे मुख्य संपादक तथा मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी केले.
            यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे बनसोडे सर, वानखेडे सर, भोले सर, इतिहासकार साळुंखे सर, सेवानिवृत्त प्राचार्य तांदळे सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे, शेरज़मा खान, गायक आणि पुस्तक विक्रेते एम.एम.शेख, सेवानिवृत्त पोलीस जमादार घोडके यांच्यासह अनेक गणमान्य विचारवंत, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे माहितीपूर्ण सूत्रसंचालन प्रशांत वासनिक यांनी केले.

👇👇👇👇👇

*गीर गाईचे शुद्ध दूध आणि तूप आता तुमच्या घरपोच*
 *पवार डेअरी फार्म – शुद्धतेची नवी व्याख्या!*

___________________________________________

*S.K.P. Motor Driving School*
Nursery road, Beed.
___________________________________________

*सुचना*
शहराच्या मध्यवर्ती भागात गाळ्यांचे भाडे आणि अनामत रक्कम गाळेधारक अव्वाच्या सव्वा सांगत असल्याने लेखन कार्यालय सुरू करण्यास जमत नाहीये. याकरिता पूर्वीप्रमाणेच चालता-फिरता लेखन कार्य करत आहे.
म्हणून लिखाण कार्य करून घ्यायचे असल्यास माझ्या - *9021 02 3121* या भ्रमणध्वनी क्रमांकावरच संपर्क साधावा. - *एस.एम.युसूफ़*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत